शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पुणे काँग्रेस

By admin | Updated: May 18, 2014 14:07 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुण्यातील काँग्रेस पदाधिका-यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम

पुणे, दि. १८ - लोकसभा निवडणुकीत राज्यातील काँग्रेसच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडण्याचे 'उद्योग' काँग्रेसच्याच पदाधिका-यांकडून सुरु आहेत. पुण्यातील काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षाच्या बैठकीत केली आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या तडाख्यामुळे देशभरात काँग्रेसची वाताहत झाली असून महाराष्ट्रही यातून सुटू शकलेले नाही. राज्यातून काँग्रेसचे अवघे दोनच खासदार निवडून आले आहेत. राज्यातील या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पुण्यातील शहर पदाधिका-यांच्या बैठकीत हा वाद उघडपणे दिसून आला आहे. 'बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा' अशी मागणी पुण्यातील काँग्रसचे शहर उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास हा विरोध आणखी तीव्र करु असा इशाराच मानकर यांनी दिला आहे. राज्याच्या नेतृत्वाने आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे असेही मानकर यांनी सांगितले.या बैठकीला पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदमही उपस्थित होते.