नाशिक : ओझर येथील विमानतळावर झालेल्या ओल्या पार्टीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता भरारी पथक मंडळाचे अधिकारी एम. एन. डेकाटे यांनी तीन दिवसांत सखोेल चौकशी करून प्रकरणाचा अहवाल अतिरिक्त प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्याकडे सोपवावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक राजेंद्र आवळे यांनी मद्य परवाना परवानगीच्या अर्टी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी हर्ष कन्स्ट्रक्शनचे विलास बिरारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. (प्रतिनिधी)पोलिसांची भूमिका बघ्याची?च्पोलीस यंत्रणेकडून मात्र किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची व त्यातील आरोपींपैकी केवळ आॅर्केस्ट्राचे संचालक सुनील ढगे यांना अटक करण्यापुरतीच भूमिका राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.च्ओली पार्टी देणारा हर्ष कन्स्ट्रक्शनचे विलास बिरारी यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे कळते. एका माजी मंत्र्याचा वरदहस्त लाभलेल्या बिरारी यांनी ओझर विमानतळाचे टर्मिनल, गंगापूर धरणावरील बोट क्लब, पोलीस आयुक्तालयाची इमारत यांसारखी कोट्यवधी रुपयांची मोठी कामे अशाच संबंधातून मिळविल्याची चर्चा आहे. याआधीची या ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ओल्या पार्ट्या दिल्याची माहिती उघड झाली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशी समिती स्थापन
By admin | Updated: February 5, 2015 01:48 IST