शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी फेटाळला २५ टक्क्यांचा फॉर्म्युला

By admin | Updated: June 28, 2017 02:09 IST

दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी वरची रक्कम फेडली तर त्यांना संपूर्ण दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी वरची रक्कम फेडली तर त्यांना संपूर्ण दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. एकूण थकबाकीच्या २५ टक्के कर्जमाफी द्यावी, हा प्रस्ताव त्यांनी फेटाळला. राज्यात दीड लाखावर थकबाकी असलेले ८ लाख शेतकरी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दीड लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण थकबाकीच्या २५ टक्के इतकी कर्जमाफी द्यावी आणि ती दीड लाख रुपयांपेक्षा अधिक नसावी, अशी सूचना सहकार आणि वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती, अशी माहिती आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी ती अमान्य केली. ही सूचना स्वीकारली असती तर तीन लाख रुपयांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्याला तीन लाखाच्या २५ टक्के म्हणजे ७५ हजार रुपये इतकीच कर्जमाफी मिळाली असती आणि त्याने २ लाख २५ हजार रुपये आधी भरल्यानंतरच ती मिळाली असती. आता तीन लाखांची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्याला दीड लाख रुपये भरले म्हणजे दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीचा शासकीय आदेश काढण्याचे काम मंगळवारी दिवसभर युद्धपातळीवर सुरू होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, वित्त तसेच सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जीआरमधील प्रत्येक बाब मुख्यमंत्र्यांनी बारकाईने तपासली. जीआर बुधवारी प्रसिद्ध केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. नागरी बँका, पतसंस्था नाहीच नागरी बँका आणि पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार नाही, हे मंगळवारी स्पष्ट झाले. जीआरचा जो ड्राफ्ट तयार करण्यात आला त्यात हे कर्ज माफ करण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. २००९ मध्ये नागरी बँकांकडील कर्जदेखील माफ करण्यात आले होते. तथापि, त्यावेळी शंभरावर नागरी बँकांनी बोगस दावे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. नंतर त्या बँकांकडून रक्कम वसूलदेखील करण्यात आली होती.