सातारा : पाचगणी पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहायक पोलिस निरीक्षकांच्या खुर्चीत बसले. त्यांनी स्टेशन डायरीत आपल्या हस्ताक्षरात संदेशही लिहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाचगणी येथील पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन फीत कापून गुरुवारी झाले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस ठाण्याच्या डायरीत संदेश लिहून पोलिसांना शुभेच्छा दिल्या.पोलिस विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या पर्यटन पथकाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यानंतर ‘दक्ष’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्यासह पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोलिस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसले मुख्यमंत्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 00:18 IST