शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना केवळ महसुलाचीच चिंता - नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 22:16 IST

शासकीय बिले भरण्यासाठी रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 13 - शासकीय बिले भरण्यासाठी रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. सर्वसामान्य लोकांना भाजीपाला खरेदीसाठी अशी सवलत त्यांनी दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वसामान्य लोकांपेक्षा शासकीय महसुलाचीच चिंता अधिक आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, नोटांच्या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी किती काळा पैसा सरकारने जमा केला, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. त्यांचा हा निर्णय फसलेला आहे. आणखी ३० डिसेंबरला असाच निर्णय घेण्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. एकप्रकारे हुकूमशाही आणि बेबंदशाहीचे दर्शन सरकार घडवित आहे. गरिबांना अन्नधान्य घ्यायचे असेल, तर जुन्या नोटा चालणार नाही आणि बिले भरायची असतील तर नोटा चालतील, असा फतवा सरकारने काढला आहे. लोकांना दिवसभर रांगा लावून पैसे बदलून घ्यावे लागत आहेत. उपाशी राहण्याची वेळ लोकांवर आली असताना, पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत. सर्जिकल स्ट्राईकचा शब्दप्रयोग नोटांच्या निर्णयासाठी करून सरकार गोरगरीब जनतेची थट्टा करीत आहे. नोटा रद्द करण्यामागचा हेतून यशस्वी झालेला नाही. किती बनावट नोटा आणि काळा पैसा सरकारी तिजोरीत आला, हे त्यांनी जाहीर करावे. असा पैसा आला नाहीच, याऊलट गोरगरीब जनतेला जीव मुठीत घेऊन पैशासाठी रांगेत थांबावे लागत आहे, असे ते म्हणाले.