शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, माझ्या मैत्रीचे राजकीय भांडवल नको - राधाकृष्ण विखे

By admin | Updated: July 11, 2017 05:34 IST

माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडून ते सोडविण्यास प्राधान्य दिले. आमची मैत्री ही केवळ विकास कामांसाठी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडून ते सोडविण्यास प्राधान्य दिले. आमची मैत्री ही केवळ विकास कामांसाठी आहे. त्याचे कोणीही राजकीय भांडवल करू नये. सरकारच्या लोकविरोधी धोरणांबाबत विरोधी पक्षनेता म्हणून संघर्षाची भूमिका कायम राहील, असे स्पष्टीकरण विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात विखे यांनी ‘हे’ सरकार मला घरच्यासारखे वाटते, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनीही विखेंसारखा विरोधी पक्षनेता अजून झालेला नाही, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. त्यानंतर विखे हे भाजपाच्या तर वाटेवर नाही ना, असे विचारले जात होते. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, साई समाधी शताब्दी आराखडा, निळवंडे कालवे आदी प्रश्नांमध्ये सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत कृतज्ञता व्यक्त केली व रखडलेल्या कामांना गती मिळावी, असा माझा प्रयत्न होता़ त्यानिमित्ताने केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला़ पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहोत.>मुख्यमंत्र्यांशी जुनी मैत्री आहे़ मी मंत्रिमंडळात असताना अनेकदा तेही माझ्याकडे सार्वजनिक हिताची कामे घेऊन येत़ ते सत्तेत असल्याने जनतेची कामे घेऊन मला त्यांच्याकडे जावे लागते. याचा अर्थ आम्ही आमच्या राजकीय भूमिका व विचारांपासून दूर गेलो, असा होत नाही. मैत्रीचा राजकीय विचारधारा व राजकारणातील निर्णयांशी संबंध जोडणे उचित नाही.- राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते, विधानसभा