मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) ग्राहकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी चार मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. या अॅपमुळे ग्राहकांना लोकाभिमुख सेवा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता व जबाबदारी वाढणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, महावितरणचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार उपस्थित होते. नागरिकांना कोणत्याही सेवेसाठी शासकीय कार्यालयात यावे लागू नये, यासाठी सर्वच विभागाने आपल्या सेवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणव्यात. या अॅपच्या माध्यमातून महावितरणच्या ग्राहकांना नवीन जोडणी देणे, त्यांच्या विविध समस्यांचे निवारण करणे आदी कामे होणार आहेत. (प्रतिनिधी)
‘महावितरण’च्या अॅपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
By admin | Updated: June 30, 2016 04:14 IST