शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By अजय पाटील | Updated: June 6, 2025 20:34 IST

विमानतळावर आगमन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महिला चालक असलेल्या पिंक रिक्षातून विमानतळ ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रिक्षाने प्रवास केला.

अजय पाटील

जळगाव - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यभरातील महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा लाभ राज्यातील महिलांना चांगल्या प्रकारे होत आहे. या योजनेसाठी शासनाकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली.

मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे आदिशक्ती मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे उपस्थित होते. संत मुक्ताई यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मुक्ताईनगरला आलो असून, पांडुरंगाकडे राज्यात यंदा दमदार पाऊस होवो व शेतकरी सुखी होवो यासाठीची प्रार्थना करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विमानतळावर पिंक रिक्षात बसून केला प्रवास..विमानतळावर आगमन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महिला चालक असलेल्या पिंक रिक्षातून विमानतळ ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रिक्षाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. या पिंक रिक्षाचे सारथ्य रंजना सपकाळे या लाडक्या बहिणीने केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेladki bahin yojanaलाडकी बहीण योजना