जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह : प्रेरणास्थळावर आदरांजली
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळात येत आहेत. येथील प्रेरणास्थळावर आयोजित आदरांजली कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
बाबूजींच्या 17व्या स्मृती समारोहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेरणास्थळावर संगीतमय श्रद्धांजली सभेत यवतमाळातील प्रथितयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करतील. (प्रतिनिधी)