शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

By admin | Updated: July 8, 2017 04:34 IST

निलंगा (जि. लातूर) येथील हेलिकॉप्टर अपघाताची घटना ताजी असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : निलंगा (जि. लातूर) येथील हेलिकॉप्टर अपघाताची घटना ताजी असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक  बिघाड झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षित असले तरी शासकीय हेलिकॉप्टरमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे व्हीआयपींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.मुख्यमंत्री फडणवीस आज (शुक्रवारी) अलिबाग दौऱ्यावर होते. शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि सहकारी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन उरकून मुख्यमंत्री डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. अलिबागवरून कार्यक्रम उरकून मुंबईला निघण्याकरता ते हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक आॅफ घेतला. हेलिकॉप्टरचा पंखा देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याला लागणार तोच उपस्थित सुरक्षारक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते बालंबाल बचावले. या माहितीला प्रत्यक्षदर्र्शींनी दुजोरा दिला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून इन्कारमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कोणताही अपघात झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा लँड करून फॅनची रिटेस्ट घेण्यात आली. त्यानंतर त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री मुंबईस सुखरूप रवाना झाले.लोकमत वेबसाइटवर प्रथम मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची ब्रेकिंग न्यूज ‘लोकमत डॉट कॉम’वर झळकताच कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी लोकमत कार्यालयात येऊन याबाबत अधिक माहिती घेतली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त आले.काळजाचा ठोका चुकलागेल्या २५ मे रोजी निलंगा येथे खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्या अपघातातून मुख्यमंत्र्यांसह इतर अधिकारी बालंबाल बचावले होते. त्यामुळे शुक्रवारच्या प्रसंगाने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.