शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

महापालिकेतील भ्रष्टाचाराला मुख्यमंत्रीही तेवढेच जबाबदार

By admin | Updated: January 29, 2017 04:59 IST

महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख असणाऱ्या आयुक्तांची नेमणूक मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. पालिकेतील प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीपेक्षा आयुक्त

मुंबई : महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख असणाऱ्या आयुक्तांची नेमणूक मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. पालिकेतील प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीपेक्षा आयुक्त व नगरविकास विभाग महत्त्वाचा असतो आणि त्याचे प्रमुखही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत घोटाळे झाले असले तर तेही त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनीच याचे उत्तर द्यावे, असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला. पालिका निवडणुकीसाठी युतीचा ‘ब्रेकअप’ झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. शिवसेनेचे खासदार व पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेवर केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचारही घेतला. ते म्हणाले, ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वात जास्त कारवाई भाजपाच्या नगरसेवकांवर केलेली आहे. राज्य सरकारच्या भाजपाचे मंत्री असलेल्या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार असून मुख्यमंत्र्यांच्या ताब्यातील गृह खात्यातही पारदर्शकता नाही. टॅँकर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या सोमय्या यांच्या मतदारसंघात शिवाजी नगरमध्ये टँकरने पाणी पुरवण्यासाठी त्यांच्या सहीची पत्रे आहेत. १५० रुपयांचे टँकर्स ७०० ते ८०० रुपयांना विकले, असा आरोप शेवाळे यांनी केला. मुलुंड डंपिंग ग्राउंडच्या बाजूला आकृती डेव्हलपर्स आणि बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी ते डंपिंग ग्राउंड बंद करण्याची किरीट यांनी मागणी केली. जय श्रॉफ या कंत्राटदारावर किरीट सोमय्या यांनी कचरा घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र त्याच्यासमवेतच ‘कोल्ड प्ले’चा कार्यक्रम केला, असे म्हणत शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांसोबतचे त्याचे फोटोही दाखवले. (प्रतिनिधी) भाजपावरील हल्लाबोल- पुण्यातील खा. संजय काकडे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप असूनही भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश देत राज्यसभेवर पाठविले. देवनार, मुलुंड डम्पिंग ग्राउंडचे काम त्यांच्याकडे होते. - कचरा घोटाळ्यातील आरोपींकडून भाजपाच्या कार्यक्रमांना ‘स्पॉन्सरशिप मिळाली. मिठी नदी व माहुल गावातील अनधिकृत बांधकामांबाबत सोमय्या यांनी तक्रार दाखल केली. मात्र त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. - मुंबईतील कंत्राटदारांची नावे पुरोहित व शाह आहेत. या नावांची लिंक कुठल्या पक्षात आहे व त्यांचे काय संबंध आहेत, हे शोधून काढले तर सर्व स्पष्ट होईल. हे सर्व कंत्राटदार एक राज्य, जिल्हा, तालुक्यातील आहेत.