शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजातील मोर्चेकऱ्यांशी मुख्यमंत्री करणार चर्चा

By admin | Updated: September 7, 2016 05:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत. पुढील महिन्यात ही चर्चा होण्याची शक्यता आहे.

यदु जोशी,  मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत. पुढील महिन्यात ही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सोमवारी गणरायाचे आगमन झाले. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे सध्या निघत आहेत. मोर्चाच्या वतीने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली जात आहेत. एकूण २० ठिकाणी मोर्चे निघणार असल्याची आमची माहिती आहे. या मोर्चांनंतर मोर्चांच्या प्रतिनिधींशी मी स्वत: चर्चा करेन. या मोर्चांचे नेते म्हणून कोणीही समोर येताना दिसत नाही. त्यातही राजकीय नेत्यांना मोर्चेकऱ्यांनीच दोन हात दूर ठेवले आहे. अशावेळी सरकार नेमके कोणाशी चर्चा करणार या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्याजिल्ह्यांत या मोर्चांचे आयोजक कोण आहेत, त्यांच्या संघटना कोणत्या याची माहिती सरकारकडे आहे. त्या आधारावरच चर्चा केली जाईल. चर्चेपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांना दूर ठेवले जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. सूत्रांनी सांगितले की, विशेषत: अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यासंदर्भात दलित समाजालाही विश्वासात घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. या संवेदनशील विषयाचा राजकीय फायदा कोणालाही उचलू न देण्याची दक्षताही त्याचवेळी घेतली जाईल. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याला सरकारने धक्का लावू नये या मागणीसाठी दलित समाजाचे मोर्चे काढण्याचे नियोजन सुरू झाले आहे. परभणीमध्ये काल यासंदर्भात एक मोठी बैठक झाली. मराठवाड्यात इतरत्रही बैठकी घेऊन मोर्चांचे आयोजन करण्याचे ठरले. या मोर्चांपासूनही दलित समाजातील प्रस्थापित नेत्यांना बाजूला ठेवले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी आज ‘लोकमत’ला दिली.