शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

११ हजार गावे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 20:32 IST

११ हजार गावे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

११ हजार गावे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस----------------------------------------------------------शहाजी फुरडे-पाटील /भक़़े गव्हाणे - बार्शी आॅनलाईन लोकमतबार्शी : महाराष्ट्रातील २२ हजार गांवे ही कायम दुष्काळग्रस्त आहेत. तेथे जलयुक्त शिवाराची कामे करुन ४ हजार गांवे दुष्काळ मुक्त केली आहेत. यावर्षी ११ हजार गावे दुष्काळ मुक्त करणार आहोत. जलयुक्त शिवारमध्ये लोकसहभागातून ४०० कोटी रुपयांची कामे होवून १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळी मंजूर केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़ बार्शी येथील गांधी पुतळा येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आपल्या समर्थकांसह राजाभाऊ राऊत यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी आ. राजेंद्र राऊत, विश्वास बारबोले, शिवाजीबापू कांबळे, कौरव माने, इक्बाल पटेल, अ‍ॅड. अनिल पाटील, अ‍ॅड. वासुदेव ढगे, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, संजय पाटील, बप्पा गव्हाणे, छोटुभाई लोहे, शिवाजीराव डिसले, संतोष निंबाळकर, सभापती लक्ष्मण संकपाळ, अरुण नागणे, रमेश पाटील, काका गायकवाड, दादा गायकवाड, विनोद काटे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, केशव घोगरे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील तालुका निर्मितीचा प्रश्न जेव्हा अजेंड्यावर येईल त्यावेळी वैराग तालुका निश्चित करु, एमआयडीसीही मदत करु, अशी ग्वाही देत, बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याचा मी शब्द देतो, काळजी करु नका. एवढेच नव्हे तर विकासासाठी लागेल ते देण्याचे काम राज्य सरकार करेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. याचवेळी जिल्ह्यातील अनेक सहकारी आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे जि.प. निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता आली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राजेंद्र राऊत हा शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारा नेता आहे. तो आपल्या पक्षात आल्याने ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेमध्ये भाजपाची सत्ता येणार आहे. जिल्हा परिषद ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची आर्थिक नाडी आहे. ऊस शेती ठिंबक सिंचनावर करावी, असे आवाहन करत कांदा व सोयाबीनला अनुदान देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे तेही मिळेल. हमीभावाने तूर खरेदी केंद्र राज्यात मोठ्यीा प्रमाणात सुरु केली आहेत. सोयाबीनवरील व्हॅट व तुरीच्या साठ्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच विजेचा प्रश्न मोठा आहे. सर्वांना दिवसा विद्युत पुरवठा करता येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागात रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो पण नाविलाज आहे. त्यासाठी सोलर विजेची निर्मिती करण्यात येत असून त्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली असून त्याला सबसिडीही मंजूर झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विजेची टंचाई भासणार नाही. अविरतपणे वीज पुरवठा करुन शेतीला पाणी देता येईल. राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यातील अन्न, वस्त्र आणि निवारा या महत्त्वाच्या गरज असून त्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे. ७० वर्षे झाली देश स्वातंत्र्य होवून पण अद्याप लोकांच्या मूलभूत गरज पूर्ण करता आल्या नाहीत. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरु केली असून २०१९ पर्यंत सर्वांना घरकुल मिळाले पाहिजे. राज्य शासनाने दीनदयाळ घरकुल योजना सुरु केली आहे. शिक्षणाच्याबाबतीत महाराष्ट्र १८ व्या क्रमांकावर होता आता तो ३ क्रमांकावर आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पण त्यासाठी डिजीटल शिक्षण योजना सुरु केली आहे. आता लोक खाजगी शाळेतून मुलांना काढून जि.प.च्या शाळेत घालत आहेत. मागील सरकारने शिक्षणाचे बाजारीकरण केले होते. गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून ५०% फी राज्य शासन भरणार आहे. तसेच त्यांच्या राहण्याच्या व जेवणाच्या व्यवस्थेवरही खर्च करणार आहे. तसेच आरोग्यावरही राज्य सरकार भरपूर खर्च करीत आहे. त्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजना सुरु केली आहे. रोजगारांसाठी केवळ एमआयडीसी तयार करुन चालणार नाही. त्यासाठी कौशल्य निर्मिती करण्याला सरकारचे प्राधान्य असून जिल्ह्यात १०० प्रशिक्षण केंद्र सुरु केली आहेत. याबरोबरच मुद्रा योजनेंतर्गत १० लाखांपर्यंतचे कर्ज नवउद्योजकांना विनातारण, विना जामीनदार दिले जाणार आहे. नोट बंदीमुळे मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. राज्य विकासाबाबत बदलत आहे. सामाजिक जीवनात परिवर्तन करण्यासाठी जिल्हा परिषद हे महत्त्वाचे केंद्र असून जि.प. वर आपल्या पक्षाची एकहाती सत्ता आली पाहिजे, असे सांगत माजी आ. राजेंद्र राऊत यांचे भाजपामध्ये स्वागत केले. सूत्रसंचालन श्रीधर कांबळे यांनी केले.-----------------------------------मराठा समाजाला निश्चित आरक्षण मिळेलमराठा आरक्षणासंदर्भात २७०० पानांचा रिसर्च अहवाल न्यायालयात सादर केला आहे. २७ फेब्रुवारीपासून या प्रकरणाची रोज सुनावणी करण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. आपल्याकडे असलेल्या पुराव्यावरुन मराठा समाजाला निश्चित आरक्षण मिळेल.-------------------------------------वैराग तालुकानिर्मितीचा प्रश्न सोडवूवैराग तालुका निर्मितीच्या प्रश्नासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील तालुका निर्मितीचे धोरण पुढे आल्यास प्राधान्याने वैराग तालुक्याचा प्रश्न सोडवू, असे म्हणून राजाभाऊ महसूलमंत्री चंद्रकांतदादा आपले जवळचे स्रेही असल्यामुळे हा प्रश्न त्यांच्यावर सोपवितो.-------------------------------जि़प़ त भाजपाची सत्ता येईलजिल्ह्यामध्ये संजयमामा शिंदे, प्रशांत परिचारक, उत्तम जानकर आदी मंडळी आपल्यासोबत आहेत. त्यामुळे सहकारमंत्र्यांना उद्देशून बापू तुम्ही मजबूत झाला आहात. त्यामुळे जि.प.त भाजपाची सत्ता स्थापन होईल. --------------------------------शेवटच्या माणसांचा विकास करा़़़राजाभाऊ राऊतांच्या भाजप प्रवेशावर बोलताना सी.एम. म्हणाले, अनेक वर्षांपासून आमची राजाभाऊंवर नजर होती. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश राहून जात होता. मात्र संघर्ष करणारे नेते म्हणून आम्ही त्यांना बोलावले आहे. चांगले काम करुन शेवटच्या माणसाचा विकास करा. जि.प.तील प्रस्तापितांचे व साम्राज्ञांचे राज्य संपविण्यासाठी आपल्या नेतृत्वाला आम्ही साथ घातली. त्याला तुम्ही प्रतिसाद दिल्याने आज हा प्रवेश होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.-----------------------------ग्रंथालय संघाचे निवेदनया कार्यक्रमात सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मागण्यांचे निवेदन जिल्हा संचालक अ‍ॅड. अनिल पाटील तर बार असो.च्या मागण्यांचे निवेदनही बार असो.चे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल झालटे, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांनी दिले. याबरोबरच शहराच्या विविध मागण्यांचे निवेदनही न.प.च्यावतीने तांबोळी व कृष्णराज बारबोले यांनी दिले़सोबत फोटो आहेत़