शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं

By admin | Updated: April 18, 2016 14:28 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं असून 122 वरुन 104 किलोवर आणलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १८ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं आहे. देवेंद्र फडणवीस आपलं वजन घटवण्यासाठी मेटाबॉलिक उपचार घेत आहेत. ज्यामध्ये औषधांसोबतच आपल्या शरिराला योग्य डायट आणि पथ्ये पाळावी लागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात डॉक्टरांशी संपर्क साधला होता. फेब्रुवारीमध्ये उपचाराला सुरुवात केली तेव्हा मुख्यमंत्र्यांचे वजन 122 होते. मात्र फक्त 3 महिन्यात मुख्यमंत्र्यांनी 18 किलो वजन घटवलं असून आता 104 किलोवर आणलं आहे. मुख्यमंत्र्यांचा टार्गेट  88 ते 90 किलो वजन आहे. अशाच प्रकारे जर त्यांनी मेहनत घेतली तर येत्या 3 महिन्यात आपलं लक्ष्य पुर्ण करतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
 
 'त्यांनी वजन घटवलं होतं, पण कामाच्या व्यापामुळे आणि अनियमित वेळापत्रकामुळे पुन्हा वजन वाढलं होतं. जेव्ही मा माझं वजन 5 ते 6 किलो घटवलं तेव्हा त्यांनाही प्रेरणा मिळाली', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
 
मेटाबॉलिक आणि बॅरियाट्रीक सर्जन जयश्री तोडकर मुख्यमंत्र्यांवर उपचार करत आहेत. 'मुख्यमंत्री असल्याने त्यांना खूप प्रवास करावा लागतो ज्यामुळे वेळापत्रकात बदल होत असलतो. मात्र तरीही त्यांची हालचाल ब-यापैकी आहे. दिवसाला 10 हजारापेक्षा जास्त पावलं चालण्यासोबतच ते चपळाईने चालतात', अशी माहिती जयश्री तोडकर यांनी दिली आहे.
फिटनेस गुरू मिकी मेहतादेखील मुख्यमंत्र्यांना शारिरिक व्यायामाचं ट्रेनिंग देत आहेत. ज्यामध्ये आठड्यातून दोन तास श्वासोच्छवासाचा व्यायाम करण्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. 'मुख्यमंत्र्यांना दिवसातून फक्त चार ते पाच तास झोप मिळते. श्वासोच्छवासाचा व्यायाम केल्याने त्यांच्या झोपेची समस्या सुटण्यात मदत होत आहे. यावर्षीच्या शेवटीपर्यत मुख्यमंत्र्यांचं वजन पुर्ण कमी होईल', असा विश्वास मिकी मेहता यांनी व्यक्त केला आहे. मिकी मेहता अमृता फडणवीस यांनादेखील ट्रेनिंग देत आहेत.
 
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसातून एकदाच चहा पिण्याची परवानगी आहे. मुख्यमंत्री मात्र बिनसाखरेचा चहा घेण्यावर भर देतात. शाकाहारी जेवणात पनीर तर मांसाहारी जेवणात चिकन, फिशचा आहार असतो. बटर आणि तूप खाण्याची परवानगी आहे मात्र त्यांचं प्रमाण कमी असावं. मुख्यमत्र्यांना सर्व प्रकारचे पदार्थ खाण्याची परवानगी आहे. जेवण कसं बनवल आहे यावर ते निर्भर आहे. त्यांना बाहेरचं खाद्य किंवा जंक फूड खाण्याची परवानगी नसल्याचं', तोडकर यांनी सांगितलं आहे.