शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘घुसखोरी’ला मुख्यमंत्र्यांचा इन्कार

By admin | Updated: March 6, 2017 05:39 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली

यदु जोशी,मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांनादेखील बसू द्यावे, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. घटनेमध्ये तशी कोणतीही तरतूद नाही, असे कारण देत त्यांनी या मागणीला खो दिल्याचे विश्वसनीय सूत्रांंनी सांगितले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला हसतखेळत हजेरी लावली. ही बैठक संपल्यानंतर दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठक पारदर्शक असावी म्हणून तीत विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांना बसू देण्याची मागणी केली. तसे करता येणार नाही आणि घटनाही त्यास अनुमती देत नाही. कारण पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेले मंत्रीच या बैठकीस उपस्थित राहू शकतात, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह सभागृहात मुख्यमंत्र्यांची पत्र परिषद झाली. मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर रामदास कदम आणि दिवाकर रावते, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मंत्री पत्रकारांशी बोलले. ‘आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही मंत्रिमंडळ बैठकीला विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांना बसू देण्याची मागणी आजही मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. या मागणीचा अभ्यास करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे शिंदे म्हणाले. मात्र, सूत्रांनी सांगितले की ही मागणी मान्य करता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्टपणे बजावले.>राजीनामे खिश्यातून बाहेर काढले : कदम‘आमचे राजीनामे खिश्यात तयार आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश येताच आम्ही राजीनामे देऊ, असे सातत्याने सांगत असलेले पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मात्र, ‘ राजीनामे आता खिश्यातून काढलेले आहेत’ असे आज स्पष्ट केले. ते म्हणाले की उद्धवजींनी सांगितले तर राजीनामा देण्याची आमची तयारी आहेच. ‘सरकारचा नोटीस पिरिएड संपला का, या प्रश्नात ते म्हणाले की ‘ते मी उद्धवजींना विचारून सांगतो’.>महाजन यांचा वॉचरामदास कदम पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजपाचे मंत्री गिरीश महाजन हे त्याच ठिकाणी बाजूला उभे राहून कदम काय बोलतात यावर लक्ष ठेऊन होते. रामदासभार्इंवर वॉच ठेवण्याची जबाबदारी महाजनांना कोणी दिली होती हे मात्र कळू शकले नाही.>नागपूरसाठी उपलोकायुक्त नाहीमुंबईच नाही तर नागपूर व इतर महापालिकांच्या कारभारावर वॉच ठेवण्यासाठीही स्वतंत्र उपलोकायुक्त नेमण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, नागपूर व इतर महापालिका या लोकायुक्तांच्या अखत्यारित येतातच त्यामुळे तिथे स्वतंत्र उपलोकायुक्त नेमला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. >मुंबईतील प्रकल्पांसाठी उपलोकायुक्तमुंबई महापालिकेसह मुंबईच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सर्व शासकीय संस्थांच्या कारभारावर वॉच ठेवण्यासाठी विशेष उपलोकायुक्त नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले. त्यात एमएमआर क्षेत्रातील संस्थांचा (जसे एमएमआरडीए, सिडको, म्हाडा आदी) समावेश असेल.>जि.प.साठी समितीजिल्हा परिषदांच्या कारभारामध्ये पारदर्शकता यावी यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणीही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. ती मात्र मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.