शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी विकत घेतला चिवडा आणि चकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 05:42 IST

सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या स्टॉलवर खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या स्टॉलवर खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी चिवडा, चकल्या यासारखे अनेक खाद्यपदार्थ विकत घेतले. प्रत्येक स्टॉलवर जाऊन मुख्यमंत्री प्रत्येक पदार्थाची माहिती घेत होते, महिलांची विचारपूस करत होते आणि त्यांचे हे रूप पाहून बार्शी तालुक्यातून आलेल्या महिला हरखून गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी स्वत:साठीच नाही, तर आपल्या स्टाफसाठीदेखील खरेदी केली हे विशेष!निमित्त होते, सचिवालय जिमखान्याच्या हॉलमधील महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांच्या प्रदर्शन व विक्रीचे. बार्शीच्या आरएसएम सेवाभावी संस्थेचे राजेंद्र मिरगणे यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यात ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या कुरड्या, शेवया, पापड, मसाले, चटण्या यांच्यासह गावरान खाद्यपदार्थांची येथे लयलूट आहे. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री विजय देशमुख यांनीदेखील प्रत्येक स्टॉलला भेट देत, तेथे आलेल्या महिलांसोबत फोटोही काढून घेतले. एरव्ही फोटोत पाहायला मिळणारे नेते आपल्यासोबत फोटो काढून घेत आहेत, हे पाहून त्यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मंत्रालय व आजूबाजूच्या भागांतील लोकांनी भेट देऊन खाद्यपदार्थांची खरेदी केली. ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर’चा पुरस्कार प्राप्त देशी गायींचे गोपालक अब्दुल रज्जाक शेख यांचाही स्टॉल येथे होता. दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या जवळपास ६० महिला व शेतकऱ्यांनी बनवलेल्या या वस्तू असल्याने त्यांना आम्ही ‘मदर टच’ असे नाव दिल्याचे मिरगणे यांनी सांगितले. या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. (प्रतिनिधी)