शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जैन पर्युषण सिध्दीतप पारणा कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 12:40 IST

पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ७ -  पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सकाळी ठाणे येथील सिंघानिया स्कूल येथे मुख्यमंत्र्यांनी जैन पर्युषण सिध्दीतप पारणानिमित्त आयोजित कार्यक्रमात येऊन उपवास ठेवलेल्या जैन बांधवांची भेट घेतली तसेच राजस्थानमधून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांचे आशीर्वादही घेतले. 
 
जैन धर्माने जगाला महान मुल्यांची शिकवण दिली
मुख्यमंत्री यावेळी उपवास ठेवलेल्या जैन बंधू आणि भगिनींना उद्देशून म्हणाले कि, जैन धर्मात ‘मिछामि-दुकडम’ असं म्हणून क्षमा मागितली जाते. या पवित्र अशा पर्वात क्षमेला महत्व असून कळत-नकळत माझ्याकडून कुणाचेही मन दुखावले गेले असेल तर मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो. आज या ऐतिहासिक अशा उपवास समाप्तीच्या निमित्ताने मला एका चांगल्या कार्यसाठी यायला मिळाले याचा मला आनंद आहे. मनुष्य आपल्या कर्मांसाठी स्वत: जिम्मेदार असतो आणि अशावेळी झालेल्या चुकींसाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे. आमच्या गुरुंनी कठीण तप करून सिद्धी प्राप्त केली आहे, आणि महान अशा मानवी मुल्यांचा अंगीकार केला आहे, त्याची शिकवण समस्त मानवजातीला दिली आहे. आज याप्रसंगी महान अशा गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्याचा लाभ मला मिलालात्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमचे काम आणखी चांगल्या पद्धतीने करूत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांची प्रशंसा
 आपल्या आशीर्वादपर भाषणात श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले कि, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजींची भूमी असून मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत. त्यांनी सर्व प्रजा अहिंसक आणि निर्व्यसनी होण्यासाठी प्रयत्न करावेत. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यातही जैन समाजातील तरुण आपले संस्कार विसरलेले नाहीत ही अतिशय चांगली आणि उत्साहवर्धक बाब आहे. याच पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीने संस्कारी बनावे. यावेळी महाराजांनी मुख्यमंत्र्यांना एक पुस्तकही भेट म्हणून दिले. यावेळी आयोजक श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल एंड ज्ञाती ट्रस्ट, कोकण क्षेत्र यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांचा मंगल तिलक लावून सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती. 
आजच्या कार्यक्रमात २३० जणांनी ४४ दिवस सिद्धी तप उपवास केला होता तसेच ३० जणांनी केवळ पाणी पिऊन उपवास केला होता. श्री पद्मयश सुरीश्वरजी महाराज, श्री वीरयश सुरीश्वरजी महाराज यांनीही यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना आशीर्वाद दिले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उत्तम सोलंखी, ललित पारेख, भवरलाल सोलंखी, विश्वस्त नारमल जैन, नगराज जैन, सचिव सुरेश बच्छावत, उदय परमार, सुरेश छाजेड, नरेंद्र जैन, वसंत जैन, रमेश पुनमिया, यांनी परिश्रम घेतले.