शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

निकषात बसत नसताना मुख्यमंत्र्यांनी दिले आश्‍वासन

By admin | Updated: August 14, 2015 00:13 IST

नवीन पीककर्ज देण्यास बँकेने दर्शविली असर्मथता; आश्‍वासन पुर्ततेसाठी ‘विशेष बाब’ प्रस्ताव.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा जिल्हा दौर्‍यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयाला २१ मे रोजी भेट देऊन विविध योजनाच्या माध्यमातून मदतीचे आश्‍वासन दिले होते. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता निकषांमुळे होत नसल्याचे समोर आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीय नलिनी आनंदा दुधमल रा.लाडणापूर यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वनपर भेट दिली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सदर कुटुंबीयाला शासकीय योजनेमधून सौर कृषी पंप, ठिबक संच तसेच पिक कर्ज योजनेचा लाभ देण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही मदत मिळत नसल्याने या शेतकरी कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता व्हावी यासाठी सहकुटुंब १0 ऑगस्टपासून उपोषण सुरु केले आहे. तेव्हा खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटूंबास दिलेल्या पत्रातुन आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी निकषाची अडचण असल्याचे स्पष्ट केले आहे. सौर कृषी पंप देण्यासंदर्भात पात्रतेचे काही निकषामध्ये लाभार्थ्यांची जमीन ५ एकारापेक्षा कमी असावी, लाभार्थी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील असावा, धडक सिंचन योजनेचा लाभार्थी असावा, लाभार्थी महावितरण कंपनीचा सद्यास्थितीत ग्राहक नसावा असे आहेत. परंतु सदर कुटुंबाकडे मौजे लाडणापूर येथील गट नं.३0१ मध्ये पुर्वीपासून कृषीपंपाची वीज जोडणी असून महावितरणचा ग्राहक आहे. त्यामुळे त्यांना सौर कृषीपंपाचा लाभ अस्तित्वात असणार्‍या नियमानुसार दिल्या जावू शकत नाही.या आत्महत्याग्रस्त कुटुंबास पीककर्ज देण्यासंदर्भात एसबीआय सोनाळा यांचा अहवाल मागविण्यात आला असता कै.आनंदा सोनाजी दुधमल यांनी १३ सप्टेंबर १२ रोजी रूपये १ लाख रूपये पिककर्ज व २ मार्च १0 रोजी रूपये ६0 हजार रू. मुदती कर्ज घेतलेले असून सदर कर्ज थकीत आहे. वरील दोन्ही कर्ज थकीत असल्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बँकेने सुध्दा असर्मथता दर्शविली आहे. या प्रकारावरून प्रशानाची हतबलताच समोर आली आहे.