शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री व राज ठाकरे उद्या एका व्यासपीठावर

By admin | Updated: February 9, 2015 06:24 IST

: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सलगीने शिवसेना नाराज होत असल्याचे संकेत वारंवार मिळत असतानाच

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सलगीने शिवसेना नाराज होत असल्याचे संकेत वारंवार मिळत असतानाच येत्या मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता सिटीलाईट सिनेमागृहात फडणवीस-राज हे पुन्हा एका व्यासपीठावर येत आहेत.‘राष्ट्रगीत राष्ट्रहित’ या राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन नेते एकत्र येत आहेत. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देशभरातील सर्व चित्रपटगृहांत सादर करण्यासाठी राष्ट्रगीत तयार केले असून, त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस व राज यांच्या उपस्थितीत होत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही या वेळी हजर राहणार आहेत.शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत अलीकडच्या काळात राज यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेनेची विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना ही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याकरिताच असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भेटीसंदर्भात जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले होते. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला मात्र हे मान्यच नाही. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा फडणवीस-राज एकत्र येत असल्याने आता शिवसेना कोणती प्रतिक्रिया देणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. (विशेष प्रतिनिधी)