शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावामधील प्रमुख अधिकाऱ्यांना जनतेसाठी वेळ नाही - राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

By admin | Updated: August 30, 2016 21:54 IST

जिल्ह्यात पाटबंधारे, वीज कंपनी, महसूल आदी प्रमुख विभागांमधील अधिकारी आपल्या कार्यालयात थांबत नाहीत. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. नागरिकांना

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 30 : जिल्ह्यात पाटबंधारे, वीज कंपनी, महसूल आदी प्रमुख विभागांमधील अधिकारी आपल्या कार्यालयात थांबत नाहीत. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. पालकमंत्री नियुक्त केले, पण तेदेखील येत नाहीत. यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत असून, यापुढे या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आपले आंदोलन अधिक तीव्र करील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिला. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, संदीप पवार, अ‍ॅड.एस.एस.पाटील, वाय.एस.महाजन आदी उपस्थित होते.

गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखविता...राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांवर जिल्हा प्रशासनाच्या पत्रानुसार गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल करण्याची जशी तत्परता दाखविली जाते. तशी तत्परता प्रशासनाने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखवावी. कांदा प्रश्नी कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते. पण अधिकारीच जिल्हाधिकारी कार्यालयात थांबत नाहीत. कार्यकर्त्यांनी तोडफोड केली नाही, अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले नाही. तरीदेखील गुन्हे दाखल झाले. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याबाबत आक्षेप नाही. परंतु आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल झाले. जिल्हाधिकारी स्वत: महिला आहे. त्यांनी महिला म्हणून संबंधित विद्यार्थिनींचे नुकसान होणार नाही याचा विचार करायला हवा होता, असा मुद्दाही पाटील यांनी मांडला.