शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

छोटा शकीलच्या खबऱ्याने दडविली ओळख

By admin | Updated: January 5, 2016 03:00 IST

जेष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे खरे नाव सय्यद अब्बाज सय्यद असे असून,

मुंबई : जेष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे खरे नाव सय्यद अब्बाज सय्यद असे असून, तो खोटे नाव वापरून ओळख लपवित असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. सय्यद अब्बाज तुबलानी हे नाव लावत होता. या नावाने त्याने अवघ्या दोनशे रुपयांमध्ये बनावट पॅनकार्ड बनविले होते. दाऊदच्या मालमत्तांच्या लिलावात सहभाग घेतल्याच्या रागातून गँगस्टर छोटा शकीलने बालाकृष्णनला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र, त्याच्या धमकीला न जुमानता, त्यांनी या लिलावामध्ये भाग घेत, पाकमोडिया स्ट्रीटवरील हॉटेल रौनक अफरोज ४ कोटी २७ लाखांना विकत घेतले. त्यामुळे छोटा शकीलने मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या सय्यदच्या मदतीने त्याचा हत्येचा कट रचला होता. सय्यदच्या अटकेनंतर छोटा शकील त्याला दरमहिना ५ ते १० हजार रुपये हवालामार्गे पुरवित असल्याचे समोर आले. सय्यदला २००८ मध्ये हैद्राबाद येथे एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तो जामिनावर बाहेर पडला. त्यानंतर सय्यद अब्बाज तुबलानीच्या नावाने मुंब्रा येथे वास्तव्यास आला. त्याने अवघ्या दोनशे रुपयांमध्ये बनावट पॅनकार्ड बनवून घेतले होते. अशा प्रकारे तो सय्यद अब्बाज सय्यद उर्फ तुबलानी उर्फ अली सय्यद उर्फ जास्मीन अशा नावाने ठिकठिकाणी भाडेतत्त्वावर राहत होता. ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या सय्यद छोटा शकीलसाठी खबरी म्हणून काम करत होता. त्याच्या घरझडतीमध्ये बाळकृष्णच्या घरचा आणि कार्यालयाचा पत्ता असलेले कागद सापडले आहेत. त्या आधारे अधिक तपास सुरू आहे. त्यात आपण कुणाच्या कानशिलातही कधी मारली नसल्याचे सय्यदने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, या प्रकरणी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)