शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ सेंट जॉर्जमध्ये दाखल

By admin | Updated: April 19, 2016 03:56 IST

माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी दुपारी २ वाजून ४ मिनिटांनी सरकारी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई : माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी दुपारी २ वाजून ४ मिनिटांनी सरकारी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.बी. भवानी यांनी ‘लोकमत’ला दिली. आॅर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना सोमवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागले. दात दुखत असून छातीतही दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी भुजबळ यांचा रक्तदाब १८०-१२० इतका झाला होता. रक्तदाब वाढल्यावर स्ट्रोकचा धोका असतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. रात्री उशिरा त्यांचा रक्तदाब काही प्रमाणात उतरून १६०-११० इतका झाला होता. रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या रक्तातली साखर ३०० वर गेली होती. इन्सुलिन देऊन त्यांची साखर नियंत्रणात आणण्यात आल्याचे अतिदक्षता विभागाचे युनिट हेड डॉ. राहुल सिक्वेरा यांनी सांगितले. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपचार सुरू आहेत. काही तपासण्यांचे अहवाल आले असून ते नॉर्मल आहेत. पण अजून काही तपासण्यांचे अहवाल यायचे आहेत. त्यानंतर पुढील उपचार ठरवले जातील. (प्रतिनिधी)