शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोंडिवते गावात रसायनमिश्रित पाणी

By admin | Updated: April 8, 2017 03:46 IST

बौद्धवाडीला शुक्रवारी सकाळी रसायनमिश्रित तांबड्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा नळपाणी पुरवठा योजनेमार्फत झाला.

सिकंदर अनवारे,दासगाव- महाड शहरालगत असलेल्या कोंडिवते गावातील मोहल्ला आणि बौद्धवाडीला शुक्रवारी सकाळी रसायनमिश्रित तांबड्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा नळपाणी पुरवठा योजनेमार्फत झाला. या रसायनिक मिश्रीत पाण्यामुळे गावात एकच हाहाकार उडाला. औद्योगिक वसाहत कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर पाहणी करण्यात आली असता येथील अनधिकृत भंगारवाल्यांचा उपद्व्याप असल्याचे समोर आले. या अनधिकृत भंगारव्यावसायिक विरोधात आणि निष्काळजी शासकीय यंत्रणा विरोधात कोंडिवते गावात संताप व्यक्त केला जात आहे.कोंडिवते गावाला महाड औद्योगिक वसाहतीमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. कोंडिवते गावाच्या साठवणटाकीतून ग्रामपंचायत पाणीपुरवठा करते. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर कोंडिवते मोहल्ल्यातील जवळपास २० तर बौद्धवाडीमधील १० नळाला लाल आणि करड्या रंगाचे पाणी आले. रासायनिक दुर्गंधीमुक्त या पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली. नक्की काय झाले हे न समजल्याने ग्रामस्थांनी महाड औद्योगिक वसाहत कार्यालयात धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर वसाहतीचे अभियंता दीपक पाटील आणि लाइनमन अशोक माने यांनी कोंडिवते गावातील या पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. त्यावेळी औद्योगिक वसाहतीतील होणारा पाणीपुरवठा शुद्ध असून केवळ मोहल्ला आणि बौद्धवाडीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचे उघड झाले. हा सर्व उपद्व्याप येथील अनधिकृत भंगारवाल्याचा असल्याचे निदर्शनास आले.कोंडिवते मोहल्ला हद्दीमध्ये करमा हुसैन अब्दुल्ला खान हा प्लास्टिक पिशव्यांचा व्यवसाय करतो. महाड औद्योगिक वसाहत आणि लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधून हा भंगारवाला प्लास्टिक पिशव्या गोळा करतो. कोंडिवते येथील स्वत:च्या मालकीच्या जागेत या केमिकलसाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांची साफ-सफाई करतो. या साफ-सफाईसाठी वापरण्यात आलेले पाणी पुन्हा पाणीपुरवठा योजनेमध्ये परत गेल्याने ही घटना घडल्याचे उघड झाले.>कारखान्यांवर कारवाईची गरजऔद्यागिक वसाहतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिशव्या, बाटल्या, टाक्या आदी सर्व सामानाची विल्हेवाट योग्य प्रकारे करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कारखान्यांना देण्यात आलेले असतात. मात्र, या निर्देशाचे पालन न करता, हाउसकिपिंगच्या नावाने ठेका काढून भंगारवाल्यांच्या गळ्यात हे प्रदूषणकारक साहित्य कारखानदार मारत असतो. त्यातूनच अशा घटना घडत असतात. या प्रकरणी गंभीर दखल घेत येथील पिशव्या त्यावरील कारखान्यांची नावे याचा तपास करून संबंधित कारखानदारांवर कारवाईची मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा योग्य आहे. मात्र, वॉल नसलेल्या नळ कनेक्शनचा पाइप केमिकलच्या पाण्यात टाकल्यामुळे हे केमिकलचे पाणी नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये मिसळले आहे. यामध्ये औद्योगिक वसाहतीचा काही गुन्हा नाही. - अशोक माने, पाइप लाइनमन, महाड औद्योगिक वसाहतकरम खान हा कोंडिवते गावचा रहिवासी आहे. त्याच्या मालकीच्या जागेत त्यांनी घरगुती वापरासाठी नळ कनेक्शन घेतलेले आहे. येथे सुरू असलेला औद्योगिक वसाहतीतील प्लास्टिक पिशव्यांचा हा व्यवसाय अनधिकृत आहे. या प्रकरणानंतर हा अनधिकृत व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात येणार असून संबंधित नळ कनेक्शन तातडीने तोडणार आहोत. या प्रकरणी खान याच्यावर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येईल.- काशीनाथ दिघे, उपसरपंच, कोंडिवतेअशा घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नसून थोड्या फार प्रमाणात रंगीत पाणी अगर पाण्याला गाळ, अशा घटना यापूर्वी अनेक वेळा घडल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणचे केमिकलचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येथील व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- अमित लाटे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड आता हा भंगार व्यवसाय गावाबाहेर टाका, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधित भंगार व्यवसायिकावर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.