शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्व भागात दुधात रसायनाची भेसळ

By admin | Updated: September 6, 2015 22:51 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : कारवाईची मागणी

अण्णा खोत- मालगाव  मिरजपूर्व भागात दूध संकलन करणाऱ्या टोळ्यांनी भेसळीसाठी विषारी घातक रसायनाची (कृत्रिम दूध) भेसळ सुरु केली आहे. मिरजपूर्व भागात दूध व्यवसाय तेजीत आहे. जनावरांच्याच्या खाद्याचे वाढते दर, त्या तुलनेत दुधाला न मिळणारा दर शेतकऱ्यांना पडवणारा नाही. मात्र दूध संकलन करणाऱ्यांचे उखळ पांढरे होत आहे. शेतकऱ्यांकडून कमी दराने केलेल्या दूध खरेदीत अधिक नफा मिळत असतानाही, त्यांनी दुधात भेसळ सुरु केली आहे. दुधाची वाढ व फॅट लागण्यासाठी आरोग्याला घातक असणाऱ्या लॅक्टो, नवसागर या रसायनाबरोबरच स्टार्च पावडर, युरियापासून तयार केलेले दूधसदृश द्रावण थेट दुधात भेसळ केले जात आहे. लॅक्टो हे रसायन फॅट वाढीसाठी वापरले जात असले तरी, यामुळे हृदयावर परिणाम होतो, वंध्यत्व व अंगफुगीवर परिणाम होतो. दूध टिकण्यासाठी युरियाचा वापर केला जातो. युरियाच्या मिश्रणाने किडनी निकामी होणे, अंधत्व येणे व विषबाधा होते, तर द्रव्याला पांढरा रंग येण्यासाठी वापरली जाणारी स्टार्च पावडर शरीरावर गंभीर परिणामकारक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. मिरज पूर्व भागात संकलन होणारे दूध शहरी भागातील खासगी दूध केंद्रांना वितरित केले जाते. यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले असून, कारवाईची मागणी आहे. कारवाई थंडावली ! -अन्न सुरक्षा कायद्याच्या निर्मितीनंतर दुधातील भेसळ शोधण्याची व कारवाईची जबाबदारी दुग्ध विकास विभागाकडून अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे. दुग्धविकास विभागाला दुधातील भेसळ करणारे व भेसळ कशी होते याबाबत माहिती व अनुभव आहे. मात्र कारवाईचे अधिकार काढून घेतल्याने दुधातील भेसळीविरुध्दची कारवाई वर्षभर थंडावली आहे. यामुळेच दूध भेसळ करणाऱ्यांचे फावले आहे.