शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरचे सहा जण बुडाले

By admin | Updated: July 7, 2014 04:13 IST

मुरूडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ पर्यटकांपैकी सहा जणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली.वृत्त कळताच चेंबूरच्या घाटला गावावर शोककळा पसरली.

मुरूड/मुंबई : मुरूडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ पर्यटकांपैकी सहा जणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली. हे वृत्त कळताच चेंबूरच्या घाटला गावावर शोककळा पसरली.मुरूड येथील पार्वती लॉजमध्ये चेंबूर, घाटला वॉर्ड नं. १४७ येथे राहणारे १७ छोटे बांधकाम व्यावसायिक पर्यटनासाठी आले होते. आज सकाळी ११ च्या सुमारास काही जण समुद्रात उतरले होते. पोहण्यास अयोग्य जागी ते नेमके पोहण्यास गेले. पोहता पोहता ते खोलगट भागात गेले. तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने आठ जण बुडाले. इतरांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक मच्छीमार त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून डोळस, अनिल बानट व देवीदास पांचाळ यांना वाचविले. मात्र इतर सहा जण खोल पाण्यात बुडाले. मृतांमध्ये विनोद देवनारायण आजाई (४०), दिनेश सखाराम पवार (४५), दिलीप रामचंद्र घोले (४५), संजय नारायण पांचाळ (४३), शंकर चव्हाण (४०) व रोहित छगनभाई झाला (५५) यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख यांनी सांगितले.