शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरमध्ये रिक्षावर झाड कोसळले, चालक सुखरूप

By admin | Updated: June 27, 2016 01:48 IST

दुपारचे जेवण करण्यासाठी रिक्षा उभी करून खाली उतरत असतानाच रिक्षावर झाड कोसळल्याची घटना रविवारी चेंबूर येथे घडली.

मुंबई : दुपारचे जेवण करण्यासाठी रिक्षा उभी करून खाली उतरत असतानाच रिक्षावर झाड कोसळल्याची घटना रविवारी चेंबूर येथे घडली. सुदैवाने दुर्घटनेत रिक्षाचालक बचावला असून, रिक्षाचे मात्र नुकसान झाले आहे. घटनेनंतर तीन तासांनी अग्निशमन दलाने हे झाडे रस्त्यावरून हटवत येथील वाहतूक सुरळीत केली.चेंबूरच्या सांडू उद्यानाजवळ ही घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. चेंबूरच्या श्रमजीवी नगर येथे राहणारा सूर्यनाथ यादव हा रिक्षाचालक नेहमीप्रमाणे सकाळीच रिक्षावर निघाला होता. दुपारी २ वाजेपर्यंत रिक्षा चालविल्यानंतर जेवणासाठी त्याने सांडू उद्यानाजवळील जॉय रुग्णालयासमोर रिक्षा उभी केली. रिक्षातून खाली उतरून तो पुढे जात असतानाच १५ ते २० वर्षे जुने असलेले झाड अचानक त्याच्या रिक्षावर कोसळले. झाड खूप मोठे असल्याने त्याखाली पूर्ण रिक्षा दबली; शिवाय सांडू मार्ग पूर्णपणे बंद झाला. ही बाब स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हे झाड हटविण्यासाठी तीन तासांचा अवधी लागला. या झाडावरून अनेक केबल आणि इंटरनेटच्या वायर्स गेल्या होत्या. झाड कोसळल्यानंतर या वायर तुटल्याने परिसरातील केबल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)>मी रिक्षातून उतरून १० पावले पुढे जाताच हे झाड माझ्या रिक्षावर कोसळले. माझे नशीब चांगले म्हणून मी वाचलो. मात्र माझ्या रिक्षाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. - सूर्यनाथ यादव, रिक्षाचालकचेंबूरचा हा सांडू मार्ग थेट चेंबूर रेल्वे स्थानक आणि सायन-पनवेल महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रविवार शिवाय पाऊस असल्याने येथे वाहनांची वर्दळ कमी होती.