शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूर पोलीस ठाणे ‘धोकादायक’

By admin | Updated: July 19, 2016 04:03 IST

चेंबूर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळून अनेक पोलीस जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

समीर कर्णुक,

मुंबई- चेंबूर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळून अनेक पोलीस जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी दुरुस्ती करण्यात यावी म्हणून वारंवार बांधकाम खात्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु याबाबत काहीच उपाय योजना करण्यात येत नसल्याने एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.चेंबूरच्या मध्यभागी असलेले चेंबूर पोलीस ठाणे ३० ते ४० वर्ष जुने आहे. पोलीस ठाण्याची इमारत दयनीय अवस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्यात पोलिसांना बसण्यासाठी जागा नसल्याने पोलीस स्व:खर्चातून काही प्रमाणात येथील डागडुजी करत आहेत. मात्र स्टेशन हाऊसमधील स्लॅब कोसळण्याचे प्रमाण वाढत असून, मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच येथे स्लॅब कोसळून एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची दूर्देवी घटना घडली होती. मात्र तरिही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही.स्टेशन हाऊस आणि संगणक कक्षामध्ये अधिकारी आणि तक्रार देण्यासाठी आलेले नागरिक बसलेले असतात. याठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकारी वर्गाने पोलीस ठाण्याची पाहणी केली. मात्र अद्यापही काहीच उपाय योजना करण्यात आली नसल्याचे चित्र आहे.