मुंबई : केरळातून मुंबईत आलेल्या एका सराफाचा मृतदेह चेंबूर पोलिसांना चेंबूरमधील एका हॉटेलमध्ये शनिवारी आढळून आला. चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखादेखील या घटनेचा समांतर तपास करीत आहे. चेंबूर स्थानक परिसरातील कमला गेस्ट हाउसमध्ये एस. सतीश (३४) हा व्यापारी गेल्या चार दिवसांपासून राहत होता. दोन दिवसांपासून त्याच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने चेंबूर पोलिसांना हॉटेकमालकाने ही बाब कळवली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमधील ३२० क्रमांकाच्या खोलीत जाऊन या व्यापाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा असल्याने त्याची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या सराफासोबत एक व्यक्ती राहत होता. मात्र तो गायब आहे.
तपासासाठी चेंबूर पोलीस केरळात
By admin | Updated: January 16, 2017 02:31 IST