शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हायवेलगत पुन्हा ‘चीअर्स’!

By admin | Updated: April 15, 2017 05:20 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बंद पडलेले मुंबईतील पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील सर्व बीअर बार, दारूची दुकाने खुली होण्याचा मार्ग आता

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बंद पडलेले मुंबईतील पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील सर्व बीअर बार, दारूची दुकाने खुली होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या दोन्ही मार्गांचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) करण्यात आले आहे. हे दोन्ही मार्ग एक्स्प्रेस-वे या वर्गामध्ये मोडतात. तांत्रिकदृष्ट्या एक्स्प्रेस-वेंना राष्ट्रीय महामार्ग वा त्यापेक्षाही वरचा दर्जा असतो. त्यामुळे राष्ट्रीय वा राज्य महामार्गांवर ५०० मीटरच्या आतील बीअर बार/दारू दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दोन्ही मार्गांवरील दारूविक्रीच बंद झाली होती. त्यात लहानमोठ्या दुकानांपासून पंचतारांकित हॉटेल्स आणि क्लबचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने काल एक आदेश काढून हे दोन्ही मार्ग पाच वर्षांसाठी एमएमआरडीएच्या स्वाधीन केल्याने त्यावरील दारूविक्री आता खुली झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा राज्यातील उत्पादन शुल्कापासूनच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. राज्याच्या तिजोरीला सात हजार कोटी रुपयांचा फटका बसेल, असा अंदाज आहे. या निकालाच्या फटक्यातून वाचण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे हस्तांतरण स्थानिक संस्थांना करण्याचा मार्ग शोधला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने पहिल्यांदा दिले होते. (विशेष प्रतिनिधी) मुंबईत सर्वत्र दारूची विक्रीपूर्व द्रुतगती मार्गावरील सायन ते मुलुंड आणि सायन ते नवी मुंबई तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रे ते दहिसर तसेच सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड यावरील ५०० मीटरच्या आतील बंद दारू दुकाने, बीअर बार खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचाच अर्थ मुंबईपासून ठाणे व नवी मुंबईपर्यंत जाताना सर्वत्र दारू मिळेल.