शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चेकमेट दरोडय़ातील तिघांनी केला लुटीचा बनाव

By admin | Updated: July 6, 2016 20:41 IST

नाशिकच्या ओझरखेड डॅम ते वणीदरम्यान पाच ते सहा जणांच्या टोळीने लुटल्याचा बनाव ठाण्याच्या चेकमेट सव्र्हिसेस प्रा. लि. या कंपनीवरील दरोडयातील तिघांनी मंगळवारी रात्री केला.

ऑनलाइन लोकमतठाणे : नाशिकच्या ओझरखेड डॅम ते वणीदरम्यान पाच ते सहा जणांच्या टोळीने लुटल्याचा बनाव ठाण्याच्या चेकमेट सव्र्हिसेस प्रा. लि. या कंपनीवरील दरोडयातील तिघांनी मंगळवारी रात्री केला. स्वत:वर दगडाने मारहाण करून रस्त्यावरच मदतीसाठी त्यांनी याचना केली. वणी पोलिसांनी त्यांना नाशिकच्या शासकीय रुगणालयात दाखल केले. मात्र, तपासात त्यांचे हे बिंगही उलगडण्यात नाशिक पोलिसांना यश आले. किरण साळुंखे (36, रा. पवननगर, नाशिक), हरिभाऊ वाघ (43, दत्तनगर, सिंचोळा, नाशिक) आणि वरुण शिंदे अशी या कथित दरोडेखोरांची नावे आहेत. ह्यचेकमेटह्ण या खासगी वित्त कंपनीवर नऊ कोटींचा दरोडा टाकल्यानंतर ठाणो पोलिसांनी आतार्पयत नऊ जणांना अटक केली असून त्यातील उर्वरित पाच ते सहा आरोपींचा माग गेल्या एक आठवडयापासून काढण्यात येत आहे. ओझर डॅम येथे मंगळवारी रात्री फिश आणि दारुची पार्टी करुन हे तिघेजण पायी जात होते

 रात्री 8 वा. च्या सुमारास ओझरखेड डॅम येथून मद्यधुंद अवस्थेत जात असतांना त्यांनी ओमनीला थांबविले. वणी जायचे, असल्याचे सांगून ते गाडीत बसले. नशेतच असल्यामुळे गाडीमध्ये त्यांनी लुटीतील सुरस कथा एकमेकांना सांगितल्या. गाडीचा चालक आणि त्याच्या साथीदांरांना हे समजताच त्यांनी गाडी एका ओसाड जागी थांबविली. नंतर या जणांच्या टोळक्याने दगड आणि लाथा बुक्यांनी त्यांना जबर मारहाण करुन त्यांच्याकडील दीड ते दोन लाखांची रोकड लुटून आणि आपल्याला गाडीतून बाहेर फेकून या टोळक्याने पलायन केले.

नंतर सुमारे दोन अडीच तास त्यातील किरण आणि हरी हे दोघे कृष्णगाव येथील रस्त्यावर मदतीसाठी प्रत्येक वाहनाला हात करुन थांबवायचा प्रयत्न करीत होते. मात्र, कोणीही थांबले नाही. अखेर नाशिक ग्रामीणच्या वणी पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग व्हॅन तिथून जात असतांना त्यांनाही त्यांनी मदतीसाठी हात केला. तेंव्हा उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांना त्यांनी हा प्रकार कथन केला. त्यांनीच 1क्8 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रात्री 11.3 वा. च्या सुमारास नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

त्यांच्यावर गुदरेला हा प्रसंग कितपत खरा आणि खोटा याची खातरजमा करण्यासाठी ठाण्यातून गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे हे बुधवारी सकाळपासून प्रत्येक बाबींची खातरजमा करीत होते. अखेर लुटीमुळे पोलीस अटक करतील, आपल्याला मारही बसेल. तो वाचविण्यासाठीच त्यांनी ही नामी शक्कल लढविल्याचीही कबुली दिली. ठाणो पोलिसांना त्यांचा ताबा घेतला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असेही एका वरीष्ठ अधिका:याने ह्यलोकमतह्णला सांगितले.(प्रतिनिधी)