शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्वरालीसाठी तपास पथके रवाना

By admin | Updated: February 9, 2017 23:37 IST

कऱ्हाडमधून बेपत्ता; श्वान पथकाद्वारे पोलिसांची शोधमोहीम सुरू

कऱ्हाड : विद्यानगर येथील डॉ. वैभव पाटील यांच्या स्वराली या चार वर्षीय बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी गुरुवारी कोल्हापूर व पाटण येथे दोन तपास पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. स्वराली बुधवारपासून गायब झाली असून, अज्ञातांनी तिचे अपहरण केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने कऱ्हाड शहर पोलिस तपास करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर येथे राहत असलेल्या डॉ. वैभव पाटील यांची चार वर्षांची मुलगी स्वराली ही नेहमीप्रमाणे बुधवार, दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात वाळूमध्ये खेळत होती. मुलगी खेळत असल्याने तिची आई घरात काम करीत होती. काम आटोपल्यानंतर काही वेळाने अंगणात मुलगी खेळत आहे का हे पाहण्यासाठी स्वरालीची आई घराबाहेर आली व तिने स्वरालीचा इतरत्र शोधाशोध केली. मात्र, ती कोठेच आढळली नाही. अखेर स्वरालीच्या आईने पती डॉ. वैभव यांना फोन करून स्वरालीचे अपहरण झाले असल्याची माहिती दिली. त्यानंतर बाहेर गेलेले वडील तत्काळ मित्रासोबत घरी आले व त्यांनी स्वरालीचा तत्काळ परिसरात शोधाशोध केला. मात्र, ती कोठेच आढळली नाही. अखेर स्वराली हरवली असल्याची फिर्याद वडील डॉ. वैभव पाटील यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत दिली. स्वरालीचे अपहरण केले असल्याचा संशय स्वरालीचे वडील वैभव यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर कऱ्हाड शहर पोलिसांनी श्वान पथकाच्या सा'ाने बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरपरिसरात तपास केला. मात्र, घरापासून काही अंतरावर श्वान पथक जाताच ते मुख्य रस्त्यावर घुटमळे.याबाबत स्वरालीचे वडील वैभव ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, ‘ती नर्सरीमध्ये शिक्षण घेत असून, बुधवारी तिच्या अपहरणानंतर कोल्हापूर, बेळगाव, पुणे, सांगली तसेच इस्लामपूर येथे राहत असलेल्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. त्यातून गुरुवारी दिवसभर स्वरालीचा इतरत्र शोधाशोध घेतला असता ती कोठेच आढळली नाही.’ दरम्यान, स्वरालीला पाटण येथे पाहिले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचे एक पथक पाटण तसेच दुसरे पथक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करत आहेत.स्वरालीच्या शोधाचे सोशल मीडियावरून आवाहनबुधवारी विद्यानगर येथून अपहरण झालेल्या स्वरालीचा शोध घेण्याचे आवाहन तिचे वडील डॉ. वैभव पाटील यांच्याकडून बुधवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर केले जात आहे. तसेच याबाबत अपहरण केलेल्या संशयितांचे रेखाचित्रही सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, या रेखाचित्राला पोलिसांनी दुजोरा दिला नाही.