शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदन कायदे तपासा

By admin | Updated: August 12, 2016 04:35 IST

सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या क्लिनिकल फोरेन्सिक मेडिसिन केंद्राचे प्रमुख डॉ इंद्रजीत खांडेकर यांनी शवविच्छेदनाबाबत

राजेश भोजेकर,  वर्धासेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या क्लिनिकल फोरेन्सिक मेडिसिन केंद्राचे प्रमुख डॉ इंद्रजीत खांडेकर यांनी शवविच्छेदनाबाबत पाठविलेल्या ८२ पानी अहवालाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. या अहावालाच्या आधारावर पंतप्रधान कार्यालयाने कायदा आयोगाला पत्र पाठवून शवविच्छेदन संबंधित देशातील कायद्यांचा अभ्यास करुन योग्य सुधारणांच्या दृष्टीने सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहे. डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण अहवालातून शवविच्छेदन संबंधित कायद्यात व्यापक सुधारणांची गरज व्यक्त केली होती. या अहवालाच्या आधारावरच कायदा आयोगाला अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून डॉ. खांडेकरांना मिळाले आहे. डॉ. खांडेकरांनी आपल्या अहवालासोबत सुमारे ४० देशांचे कायदे सरकारला अभ्यासाला दिले आहेत. हा अहवाल तयार करण्यासाठी कायदा आयोगाचे संबधित ९ अहवाल, याबाबत १८६१ पासून लागू असलेले जुने व नवीन फौजदारी प्रक्रिया व इतर कायदे, इतर ४२ देशांचे कायदे, माहिती अधिकारात मिळालेली माहिती तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा डॉ. खांडेकरांनी अभ्यास करुन हा अहवाल पूर्ण केला.भारतातील पोलीस यंत्रणा शवविच्छेदनासाठी १८९८ पासून ब्रिटिशांनी दिलेल्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ चा वापर करतात. ब्रिटिशांनी ह्या तरतुदीमध्ये अमुलाग्र बदल केलेत. परंतु, देशात विद्यमान स्थितीतही कालबाह्य तरतुद कायमच आहेत.११७ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या अपरिपूर्ण व कमकुवत १७४ कलमाकडे सरकारचे, पोलीस व कायदा विभागाचे तसेच कायदेमंडळाचे साफ दुर्लक्ष झाले. यावरून मृतक व त्यांच्या अधिकारांना तसेच गुन्ह्याचा तपास शास्त्रीय पद्धतीने व्हावा, या बाबीला काहीच किमत नाही. हे हेरुन डॉ. खांडेकरांनी ८२ पानी अहवालाद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. गुन्ह्यातील शिक्षा होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे, अशी सर्वत्र ओरड असतानाही न्यायवैद्यक प्रकरणात मृत्युच्या कारणाची चौकशी शास्त्रीयदृष्ट्या व्हावी, शवविच्छेदनाचा दर्जा सुधारावा, या दृष्टीने ११७ वर्षांमध्ये कायद्यात एकही सुधारणा करण्यात आली नाही, याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.