वाशिम : फेसबुकच्या माध्यमातून सूत जुळवून एका तरुणाने मुंबईच्या एका युवतीची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. वाशिमच्या या रोमिओने युवतीचे शोषण करून ितची आर्थिक लुबाडणूकही केली. मुंबईच्या एका युवतीची गतवर्षी जिल्ह्याच्या मालेगाव येथील विशाल अनिल अडिचवाल (२८) या विवाहित तरुणाशी फेसबूकवरून ओळख झाली. त्याने आपण विवाहित असल्याची बाब युव तीपासून लपवली. त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. विशाल मुंबईला जाऊन युवतीची भेट घेऊ लागला. लग्नाचे आमिष दाखवून अनिलने त्या युव तीशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. त्यानंतर परदेशात जाण्याची सबब देत, त्याने युवतीकडून १६ व १२ ग्रॅमचे दागिने नेले. नंतर मात्र अनिल लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. चौकशी केली असता, तो विवाहित असल्याचे युवतीला समजले.यासंदर्भात विचारणा करण्यासाठी शुक्रवारी मालेगाव येथे अनिलच्या आई-वडिलांची भेट घेतली असता, त्याच्या कुटुंबियांनी आपणास मारहाण केल्याचे युवतीने तक्रारीत म्हटले आहे. युवतीच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी विशाल, त्याचे आई-वडील अनिल व शिला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
फेसबुकच्या माध्यमातून मुंबईच्या युवतीची फसवणूक
By admin | Updated: May 9, 2015 01:48 IST