पुणो : धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्याचे सांगून राज्य शासनाने फसवणूक केली आहे, असा दावा धनगर आरक्षण संघर्ष कृती समितीतर्फे सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. 15 दिवसांत समाजाचा महामेळावा बोलावून आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल. तसेच महायुतीसोबत जाण्याविषयीचा निर्णय संपूर्ण समाजाच्या मान्यतेने ठरविला जाईल, अशी भूमिकाही जाहीर करण्यात आली.
कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ, कार्याध्यक्ष बाळासाहेब गावडे आणि समन्वयक नवनाथ पडळकर हे पत्रकार परिषदेस उपस्थित होते. आरक्षण अमंलबजावणी प्रकरणी राज्य शासनाने फसवणूक केल्याने राज्यभरात निषेध मोर्चे काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय अशा 3क्9 ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काळय़ा फिती लावण्यात आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
धनगरांच्या आंदोलनात वरकरणी विस्कळीतपणा असला तरी धनगर आरक्षण संघर्ष कृती समितीच्या 23 जणांच्या समितीकडून एकमताने निर्णय घेतले जातात, असे गावडे यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत आरक्षणाची मागणी मान्य करणा:या पक्षाला पाठिंबा दिला जाणार आहे. महायुतीसोबत जाण्याचा निर्णय केवळ महादेव जानकर यांनी घेऊन चालणार नाही तर तो निर्णय संपूर्ण समाजाच्या मान्यतेने ठरविला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)