शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

मिहानमधील उद्योगांना स्वस्त वीज

By admin | Updated: November 23, 2014 00:40 IST

मिहान-सेझमधील उद्योगांना शनिवार मध्यरात्रीपासून प्रति युनिट ४.३९ दराने वीज पुरवठा सुरू झाला. पण स्वस्त दरातील वीज केवळ तीन महिनेच अर्थात २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच मिळेल. वाचकांना हे माहीतच असेल की,

केवळ तीनच महिने फायदा : गुंतवणूकदार आकर्षित होणारसोपान पांढरीपांडे -नागपूरमिहान-सेझमधील उद्योगांना शनिवार मध्यरात्रीपासून प्रति युनिट ४.३९ दराने वीज पुरवठा सुरू झाला. पण स्वस्त दरातील वीज केवळ तीन महिनेच अर्थात २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच मिळेल. वाचकांना हे माहीतच असेल की, ३ नोव्हेंबरला नागपुरातील प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहान-सेझमधील उद्योगांना १५ दिवसाच्या आत स्वस्त दरात वीज मिळेल, अशी घोषणा केली होती. त्याचे कारण हे की, अभिजित समूहाने यावर्षीच्या मार्चमध्ये आपला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बंद केल्यानंतर येथील उद्योगांना महावितरणकडून प्रति युनिट ७ ते ८ रुपये दराने वीज खरेदी करावी लागत होती. स्वस्त वीज कशी मिळणार?मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा उघड केले होते की, एमएडीसी ही मिहान-सेझची नोडल एजन्सी असून त्यांच्याकडे वीज वितरणाचा परवाना आहे. या परवान्याचा उपयोग ते खुल्या बाजारातून अर्थात एनर्जी एक्सचेंज आॅफ इंडियाकडून वीज खरेदीसाठी करतील आणि मिहान-सेझमधील उद्योगांना देतील. मुख्यमंत्री हे एमएडीसीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, हे उल्लेखनीय. यादरम्यान गेल्या आठवड्यात एमएडीसीने वीज पुरवठ्यासाठी परवानगी मिळावी, या आशयाचा अर्ज महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे केला होता. अंतिम टेरिफ निश्चित करून अर्ज आयोगाने निकाली काढताना उद्योगांना विजेचे वितरण करण्यासाठी १९ नोव्हेंबरला एमईआरसीने प्रति युनिट ४.३८६ रुपये अर्थात ४.३९ रुपये दर निश्चित केला. त्यानंतर एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी शनिवार मध्यरात्रीपासून स्वस्त दरातील वीजपुरवठा सुरू केला. उपाय तात्पुरताश्रीखंडे यांनी सांगितले की, आयोगाने मान्यता दिलेला प्रति युनिट ४.३० रुपये दर हा केवळ तीन महिन्यांसाठी अर्थात २८ फेब्रुवारीपर्यंतच राहील. त्यानंतर टेरिफवर पुनर्विचार होईल. हे जाणून घेणे गरजेचे आहे की, एनर्जी एक्स्चेंजचे कार्य मागणी आणि पुरवठ्यावर चालते. त्यामुळे विजेचे दर प्रत्येक तासाला बदलत असतात. अशा वातावरण वीज खरेदी अडचणीची ठरणार आहे. सध्या मिहान-सेझमध्ये केवळ १२ युनिट कार्यरत आहेत. दोन महिन्यांत टीसीएस आणि बोर्इंग एमआरओ हे दोन युनिट पुन्हा कार्यरत होतील. एमएडीसीचे मुख्य अभियंते एस.व्ही. चहांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन महिन्यानंतर विजेची मागणी २ वरून ५ मेगावॅटवर जाईल. एनर्जी एक्स्चेंजकडून एवढी वीज खरेदी करणे सध्यस्थितीत शक्य आहे. पण जेव्हा मागणी ५० मेगावॅटवर जाईल तेव्हा खरी परीक्षा राहील. कारण एवढी वीज बाजारदराने विकत घ्यावी लागेल. स्वस्त दरात वीज उपलब्ध झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. हा दर गुंतवणूकदारांना आकर्षित करणार आहे. अंतिम टेरिफ ५ रुपये प्रति युनिट होणार!एमएडीसीने प्रति युनिट ४.३९ रुपये वीज पुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली असली तरीही प्रत्यक्षात हा दर ५ रुपये प्रति युनिट असू शकतो. कारण एमएडीसी विजेच्या पुरवठ्यासाठी अभिजित समूहाच्या ट्रान्समिशन नेटवर्कचा उपयोग करीत आहे. या नेटवर्कचा किराया अभिजित समूहाला द्यावा लागेल. अभिजित समूहाचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आयोगाच्या निर्णयानंतर अभिजित समूहाने प्रति युनिट किरायाच्या घटकांची गोळाबेरीज केली असून लवकरच आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करणार आहे. त्यानंतर हा किराया एमएडीसी ग्राहकांकडून वसूल करेल. हा किराया प्रति युनिट ५० ते ७० पैसे असू शकते. त्यामुळे प्रति युनिट दर ५ रुपयांवर जाणार आहे.