शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चौफुल्याची न्यू अंबिका संगीत पार्टी प्रथम

By admin | Updated: February 2, 2016 04:11 IST

२४ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात यवत-चौफुला (जि.पुणे) येथील न्यू अंबिका कला केंद्र या संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकाविला.

अकलूज : २४ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात यवत-चौफुला (जि.पुणे) येथील न्यू अंबिका कला केंद्र या संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकाविला. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने २९ ते ३१ जानेवारी दरम्यान २४ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक गटात १४ संघांनी भाग घेतला होता. लावणी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच चौफुला संघाने प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ऊर्मिला नगरकर, पिंंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे जि. सातारा व वैशाली समलासपूरकर, जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी जि. पुणे या संघांना विभागून देण्यात आला. त्यांना प्रत्येकी २० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले. तृतीय क्रमांक राजलक्ष्मी लोकनाट्य कला केंद्र, बार्शी या संघाने पटकाविला. त्यांना रुपये १५ हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले. चतुर्थ क्रमांक लंका नयना प्रतीक्षा अकोलकर, पिंंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे जि. सातारा या संघास रोख रुपये १० हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले. पाचवा क्रमांक मोडनिंंब जि. सोलापूर येथील वैशाली वाफळेकर नटरंग लोकनाट्य कला केंद्र या संघास रुपये ५ हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले. (प्रतिनिधी)रौप्य महोत्सवी वर्षात१६ संघांचा सहभागराज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे २०१७ हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पुढील वर्षी २८ व २९ जानेवारी रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पारंपरिक गटातील ९ व व्यावसायिक गटांतील ७ अशा निवडक १६ संघांनाच स्पर्धेत सहभागी करून घेतले जाईल व प्रत्येक संघाला रुपये एक लाख मानधन दिले जाईल, असे विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले.