शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे महामार्गावर चक्का जाम

By admin | Updated: January 1, 2017 20:53 IST

नववर्षाचे स्वागत करून परत मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.

ऑनलाइन लोकमत

नवी मुंबई, दि. 1 - नववर्षाचे स्वागत करून परत मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. मुंबई-पुणे व गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. कळंबोली ते कोन गावापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील हजारो नागरिक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोणावळा, महाबळेश्वर, अलिबाग, माथेरान व इतर ठिकाणी गेले होते. या परिसरातील सर्व हॉटेल्स हाउसफुल्ल झाली होती. रविवारी सायंकाळी परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. पनवेलजवळील कोनगाव ते कळंबोलीपर्यंत दहा मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत होता. रात्री आठनंतर सीबीडी परिसरामध्येही वाहतूककोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडी व हॉर्नचा कर्कश आवाज, यामुळे प्रवासी त्रस्त झाले होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती. सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने कामोठेजवळ काम पूर्ण केलेले नाही. अर्धवट कामाचा फटकाही वाहतुकीला बसला. मानसरोवर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या जोडरस्त्याजवळ वाहतूक ठप्प झाली होती. याशिवाय उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी खड्डे असल्यानेही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असल्याने, प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चौकट निकृष्ट कामाचा फटका सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम योग्य प्रकारे झाले नाही. कामोठे, खारघर परिसरात काम रखडले आहे. भुयारी मार्ग बंद असल्याने, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागत असल्याने, वाहने धिम्या गतीने चालवावी लागत आहेत. यामुळे रविवार व इतर सुट्ट्यांच्या दिवशी सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (छायाचित्र - भालचंद्र जुमलेदार)