शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकीलही पडताळणार चार्जशीट

By admin | Updated: June 29, 2016 02:03 IST

दोषारोपपत्राची (चार्जशीट) आता जिल्हा सरकारी अभियोक्ताबरोबरच त्यांनी नियुक्त केलेल्या सहायक सरकारी वकिलांकडूनही पाहणी केली जाणार आहे.

मुंबई : फौजदारी गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलिसांकडून दाखल केल्या जाणाऱ्या दोषारोपपत्राची (चार्जशीट) आता जिल्हा सरकारी अभियोक्ताबरोबरच त्यांनी नियुक्त केलेल्या सहायक सरकारी वकिलांकडूनही पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या मध्यवर्ती संनियंत्रण समितीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. दोषारोपत्राचे वाढते प्रमाण, तुलनेत जिल्हा सरकारी वकिलांची संख्या अपुुरी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.राज्यातील गुन्ह्यांच्या तुलनेत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असल्याने त्यात वाढ करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस आघाडीने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली होती. त्यांनी सुचविलेल्या शिफारशीनुसार त्याबाबत कार्यवाही केली जात आहे. त्यात फौजदारी खटल्यात सिद्धपराध प्रमाण वाढविण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांमध्ये एखाद्या गुन्ह्याबाबत ‘चार्जशीट’ बनविल्यानंतर ते न्यायालयात सादर करण्यापूर्वी त्याची मध्यवर्ती संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायालयातील खटल्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्ता तर न्यायदंडाधिकारी न्यायालयातील खटल्यासाठी सहायक संचालकांचा समावेश होता. मात्र राज्यभरात कार्यरत असलेली ही पदे लक्षात घेता गुन्ह्यांचे प्रमाण अनेक पटीने अधिक आहे. त्यामुळे सर्वच चार्जशीट पाहाणे त्यांना शक्य नसल्याचे त्यांच्याऐवजी त्यांनी नेमलेल्या सहायक सरकारी वकिलाकडूनही हे काम करवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायदंडाधिकारी न्यायालयातील खटल्यात त्याबाबतचे काम सहायक संचालक किंवा त्यांचा प्रतिनिधी व तालुकास्तरावर वरिष्ठ सहायक अभियोक्ता या समितीत कार्यरत राहू शकणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>गुन्ह्यांचे प्रमाण अधिकदोषारोपत्राचे वाढते प्रमाण, तुलनेत जिल्हा सरकारी वकिलांची संख्या अपुुरी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आहे.जिल्हा सत्र न्यायालयातील खटल्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्ता तर न्यायदंडाधिकारी न्यायालयातील खटल्यासाठी सहायक संचालकांचा समावेश होता. गुन्ह्यांचे प्रमाण अनेक पटीने अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.