अमरावती : भारतीय जनता पार्टी हा सत्तेसाठी हपापलेला पक्ष असून, गोरगरिबांच्या प्रश्नांबाबत या सरकारला काही घेणे-देणे नाही, असा आरोप काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केला.काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते़ शिंदे म्हणाले, चीनचे पंतप्रधान हे भारतात आले असता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाळण्यावर गप्पा मारत होते. तर तिकडे सरहद्दीवर चीनचे सैनिक भारतीय सैन्यावर गोळीबार करीत होते. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यात केंद्रातील भाजपा सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय आतापर्यंत घेतला नाही. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु आहे. अमरावती जिल्'ातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. परंतु भाजपा सरकारला याचे काही देणे-घेणे नसल्याची टीका त्यांनी केली़ (प्रतिनिधी)
भाजपा सत्तेसाठी हपापलेला पक्ष ज्योतिरादित्य शिंदेंचा आरोप
By admin | Updated: October 11, 2014 05:44 IST