शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जमावाने दिला आरोपीला चोप

By admin | Updated: September 16, 2016 01:56 IST

गणपती पाहायला ट्रॅक्टरने जाणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टर अडवून काही तरूणांनी महिलांची छेड काढून दोन तरूणांना मारहाण केली.

तुमसर (भंडारा) : गणपती पाहायला ट्रॅक्टरने जाणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टर अडवून काही तरूणांनी महिलांची छेड काढून दोन तरूणांना मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता पवनारखारी मार्गावर घडली. यात दोन तरूण जखमी झाले. दरम्यान मारहाण करणाऱ्या तरूणांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने गोबरवाही पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यावेळी मारहाण करणारा तरूण ठाण्यात माहीत असल्याचे कळताच संतप्त नागरिकांनी त्याला ठाण्याबाहेर काढून चोप दिला.यावेळी काही काळासाठी तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी सहा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेत राजेंद्र इळपाते (२०) आणि मुकेश गेडाम (२०) हे गंभीररित्या जखमी झाले. त्या दोघांनाही रात्रीच गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते.पवनारखारी येथे गणपती पाहायला गोबरवाही व परिसरातील महिला ट्रॅक्टरने जात होत्या. दरम्यान, रस्त्यात काही तरूणांनी ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालकास मारहाण केली. ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या आदिवासी तरूणीची छेड काढली. याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदविण्यात आली. दुपारच्या सुमारास आदिवासी महिला, तरूणी, पुरूष तथा ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पाहतापाहता शेकडोंचा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमा झाला. या तरूणांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार चरण वाघमारे यांनी गोबरवाही येथे पोलीस ठाण्यात आंदोलकांशी चर्चा करुन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, जि.प. सदस्य संदीप टाले, प्यारेलाल धारगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नौशाद खान पठाण (२५), पीयूष पांडे (२२), जीतू नेवारे (२५) यांच्याविरूद्ध भादंवि ३४१, ३२४, ५०६, आर्म्स अ‍ॅक्ट ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. यातील तीन आरोपी फरार आहेत.(तालुका/शहर प्रतिनिधी)