शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बदलती तंत्रभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 04:11 IST

भाषा दर दहा कोसांवर बदलते असे म्हणतात. तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते, हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे

- अ. पां. देशपांडे -भाषा दर दहा कोसांवर बदलते असे म्हणतात. तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते, हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे, तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतरिवाज, संस्कृती, शिक्षणपद्धती, परिमाणे इत्यादी बदलतात आणि तसतशी जुनी भाषा कालबाह्य होते. त्यात आता बदलत्या तंत्रज्ञानाचा झपाटा आला आहे. त्यामुळेही भाषा बदलते.भाषा दर दहा कोसांवर बदलते हे आजच्या तरु णांना समजणार नाही. कारण कोस म्हणजे काय? दोन मैलांचा एक कोस होतो. पण मैल म्हणजे काय? अमेरिका सोडता जगात इतरत्र मैलांचे किलोमीटर झाले. त्यामुळे जिथे मैल समजत नाही तिथे कोस आणखी कोसभर दूर राहिला. मग आता दर दहा कोसांवर भाषा बदलते म्हणण्याऐवजी दर ३२ किलोमीटरवर भाषा बदलते असे म्हणायला हवे. याशिवाय एका संज्ञेवरून दुसरी संज्ञा तयार होते, तिचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होतो. त्याला अजून तरी पर्याय आले नाहीत. उदाहरणार्थ मोटार गाडीत, विमानात, आगगाडीत वेग मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला मायलोमीटर म्हणतात. मैलांचे किलोमीटर झाले तरी मायलोमीटरचा मायलोमीटरच राहिला. त्याचा काही कायलोमीटर झाला नाही. दुसरे उदाहरण, आगगाडी येण्यापूर्वी मुंबईहून पुण्याला जाणारे टपाल घोड्यावरून जाई. पहिला टप्पा बदलापूरपर्यंतचा असे. तेथे घोडे बदलत व टपाल पुढे जाई. म्हणून त्या गावाला बदलापूर म्हटले जाई. पण आता टपाल आगगाडीने जात असल्याने बदलापूरचे घोडे बदलण्याचे स्थानमहात्म्य गेले, तरी त्या गावाचे नाव बदलापूरच राहिले. जसे मैल गेले तरी मायलोमीटर हे नाव राहिले तसे. मैलावरून आलेली आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे, दोन गावांच्या मध्ये मैलांचे दगड अंतरे दर्शवण्यासाठी लावलेले असतात. आता जी.पी.एस. सिस्टिममुळे अंतरे आपापल्या मोबाइलवर मिळत असली तरी मैलांचे दगड अस्तित्वात आहेत. ते अजून किलोमीटरचे दगड असे म्हणायची पद्धत पडली नाही. त्याशिवाय मनुष्याच्या आयुष्यातील, संस्थेच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींना आपण माइल्स्टोन असे म्हणतो, त्याचे काय करायचे? उदाहरणार्थ, चाकांचा शोध हा मानवी उत्क्रांतीतील मैलाचा दगड मानला जातो. मी मैलोनमैल चालत जातो या गोष्टीला काय म्हणणार? इंग्रजीत या गोष्टीला माइलेज असा शब्द रूळला आहे आणि तो तर अनेक अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ, एस.एस.सी. परीक्षेला पहिला आल्यामुळे एखाद्या मुलाला आयुष्यात खूप माइलेज मिळाले असेही आपण म्हणतो.यार्ड, फूट, इंच ही परिमाणे मोजण्यामापनाची पद्धत, मेट्रिक पद्धत १९५७ सालापासून भारतात वापरली जाऊ लागल्यानंतर कालबाह्य ठरून आता मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर आले. मग वसंत बापटांची इंच इंच लढवू छाती ही काव्यातील ओळ कालबाह्य होणार का? इंग्रजीतील एक छान उदाहरण आठवते. दोज हू स्पीक इन यार्डस अँड मूव्ह इन इंचेस शुड बी ट्रीटेड विथ फूट. फार पूर्वी सोने वगैरेसारख्या मौल्यवान गोष्टी तोलण्यासाठी गुंजा, मासा ही परिमाणे वापरत. (१६ गुंजा = १ मासा, १२ मासे = १ तोळा, आणि ९६ तोळे = १ शेर. एक शेर हा अंदाजाने १ किलोग्रॅम वजनाएवढा म्हणायचे) वैद्य लोकही औषधे देताना पूर्वी ही वजने वापरत. शिवाय ते ही भाषाही वापरत. उदाहरणार्थ, एखाद्याची तब्येत खूप नाजूक झाली असेल तर त्याची तब्येत तोळा-मासा झाली आहे म्हणत. गुंज ही लालभडक रंगाची असे. एखाद्या दारू प्यायलेल्या माणसाचे डोळे जसे लाल होतात, तेव्हा त्याला तुझे डोळे गुंजेसारखे लाल झाले आहेत म्हणत. आता असे जर कोणा दारू प्यायलेल्याला म्हटले, तर तो म्हणेल, तू काय म्हणतोस ते मला समजत नाही, तू काय गांजा-भांग घेतली आहेस का? पूर्वी पावशेर , म्हणजे शेराचा पाव भाग होता. आताही आपण पाव किलो म्हणतोच. पण दारू पिऊन आलेल्याला काय रे तू पावशेर मारून आलास का, असे विचारत नाही. समाज तंत्रज्ञानात पुढे पुढे जातो तसतशी नवीन भाषा व्यवहारात येते आणि जुनी भाषा मागे पडत जाते.