शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मांढरगडावर ‘चांगभलं’चा गजर!

By admin | Updated: January 6, 2015 02:02 IST

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळुबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी सोमवारी गर्दी केली होती.

मांढरदेव : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळुबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी सोमवारी गर्दी केली होती. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने मांढरगड दुमदुमला. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत कडाक्याची थंडी आणि दाट धुके असल्याने भाविकांना दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लावाव्या लागल्या.शाकंभरी पौर्णिमेचा (पौष पौर्णिमा) दिवस असल्याने असंख्य भाविक गडावर दाखल झाले होते. पौर्णिमेच्या मुख्य दिवशी सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. पी. रघुवंशी व प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. देवीच्या दारातील प्रथम भाविक पांडुरंग सखाराम खोपडे व त्यांच्या पत्नी रत्नाबाई यांना पूजेचा मान मिळाला. खोपडे हे मुळचे पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील असून सध्या मुंबईला राहतात. सोमवारी दुपारी अनेक गावांचे देव्हारे व पालख्या मंदिर परिसरात आल्या. त्यामुळे काही काळ गर्दी झाली होती; परंतु पोलीस व स्वयंसेवकांनी उत्तम नियोजन केल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी) देवीला गोड नैवेद्यमांढरदेव येथे पशुहत्या करण्यास बंदी आहे. त्यामुळे लोक देवीला गोड नैवेद्य दाखवत होते. सातारा जिल्ह्याच्या मांढरदेव गडावरील श्री काळुबाईच्या यात्रेनिमित्त सोमवारी राज्यासह आंध्र आणि कर्नाटकातील भाविकांची गर्दी उसळली होती.