शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लष्करातील तंत्रज्ञानात होणारे बदल आव्हनात्मक - डॉ अनिल सहस्त्रबुद्धे

By admin | Updated: May 30, 2016 13:39 IST

एनडीए सारख्या संरक्षण शिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये आणि संरक्षण शिक्षणात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाचा वापर होणे आवश्यक आहे असे वक्तव्य अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत -

पुणे, दि. 30 - सध्याच्या काळात तंत्रज्ञान झपाटयाने बदलत आहे.  संरक्षण क्षेत्रात तर हा वेग खुप जास्त आहे. विशेषत: देशाला बाह्य व अंतर्गत धोके वाढत असल्याच्या काळात तर तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. म्हणूनच एनडीए सारख्या संरक्षण शिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये आणि संरक्षण शिक्षणात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाचा वापर होणे आवश्यक आहे असे वक्तव्य अनिल सहस्त्रबुद्धे (अध्यक्ष, एआयसीटीई) यांनी एनडीएच्या 130 व्या पदवी प्रदान सोहळया प्रसंगी केले. यावेळी एनडीएच्या महाविद्यालयचे प्राचार्य प्रा डॉ ओमप्रकाश शुक्ला, वाइस एडमिरल अशोक कुमार उपस्थित होते.
 
एनडीए ही भारतातच नाही, तर जगात संरक्षण विषयक सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेचा देशाला अभिमान आहे. एनडीएच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमच्याकडे एनडीएने बी.टेक साठी सादर केलेल्या प्रस्तावाची प्रक्रिया लवकरच पुर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. 
 
हजारो जणांना पदव्या मिळतात मात्र तुम्हाला मिळत असलेली पदवी जास्त महत्वाची आहे असेही ते म्हणाले. यावेळी  298 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली त्यातील  64 जणांना बॅचलर ऑफ आर्ट्स, 110 जणांना बॅचलर ऑफ सायन्स आणि 124 जणांना कॉम्प्युटर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.
 
देशाच्या संरक्षण क्षेत्रातील अधिकारी घडवाणा-या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील पदवीप्रदान सोहळा पार पडला. हा १३० व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा होता. एनडीएमध्ये नौदल, हवाई दल आणि पायदळ तिन्ही क्षेत्रांसाठी अधिकारी घडवले जातात.