शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीचे बदलते पाऊल

By admin | Updated: June 5, 2015 01:46 IST

सिनेमा थियेटर्स, पर्यावरणस्नेही रंगाचे स्टॉल अशा विविध जनजागृतीपर उपक्रमांतून पर्यावरणस्नेही होळी राज्यात नैसर्गिक रंग उधळू लागली आहे.

ईको फ्रेंडली होळी सलग सहा वर्षांपासून पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्यासाठी दूरचित्रवाहिन्या, रेडिओ वाहिन्या, राज्यातील ३५० डिजिटल सिनेमा थियेटर्स, पर्यावरणस्नेही रंगाचे स्टॉल अशा विविध जनजागृतीपर उपक्रमांतून पर्यावरणस्नेही होळी राज्यात नैसर्गिक रंग उधळू लागली आहे. वर्तमानातील समाज जीवनात चांगली गोष्ट समाजासमोर मांडल्यानंतर तो समाज लवकर स्वीकारतो याचंच हे द्योतक आहे. आज अनेक सामाजिक संघटना, महिला बचत गट, रंग तयार करणारे औद्योगिक उत्पादक मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग तयार करू लागले आहेत. बाजारातील वाढत्या मागणीमुळे सहा वर्षांपूर्वी जो नैसर्गिक रंग रु. १५00 ते १६00 किलो या दराने विकला जात होता तोच नैसर्गिक रंग आज रु. ५00 प्रति किलो या दराने उपलब्ध होऊ लागला आहे. भविष्यात राज्यात नैसर्गिक होळी खेळली जाईल असा ठाम आत्मविश्वास मला वाटतो. या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री रामदास कदम व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, यांनी व्हाइस कॉलद्वारे राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त जनतेशी मोबाइलवर संपर्क साधून पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असे अनोखे आवाहन केले होते. त्याला राज्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ईको फ्रेंडली गणेश स्पर्धागेल्या पाच वर्षांपासून मुंबई व पुणे शहरासह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गृहनिर्माण सोसायटी / रहिवासी संकुल, घरगुती गणेशात्सव यांच्याकरिता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा याकरिता राज्यातील अग्रगण्य वर्तमानपत्रे व दूरचित्रवाहिन्या यांच्या संयोगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मागील वर्षी केवळ मुंबई शहर व आजूबाजूच्या परिसरात एक लाखापेक्षा जास्त पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची विक्री केली गेली होती. सन २0१0 साली मुंबई शहरात कणकवलीचे मूर्तिकार प्रमोद पालव यांच्या सहकार्यामुळे क्रांती मित्र मंडळाची २१ फुटी गणेशमूर्ती पर्यावरणस्नेही साकारली होती. पण आता व्यापक जनजागृतीमुळे गेल्या वर्षी मुंबई शहरातील ५0 सार्वजनिक गणेशोत्सवांत सात फुटांपासून अठरा फुटांपर्यंत पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केल्या होत्या. म. प्र. नि. मंडळाच्या व्यापक जनजागृतीमुळे ईको फ्रेंडली गणेशोत्सव ही चळवळ चांगलीच जोर धरू लागली आहे. या जनजागृतीच्या चळवळीत श्री गणेश कला केंद्र, पर्यावरण दक्षता मंच, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, नरेश दहिबावकर, अनेक मूर्तिकार, सामाजिक संस्थांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. ईको फ्रेंडली दहीहंडीदहीहंडी उत्सवातील वाढत्या उत्साहामुळे मुंबईसारख्या शहरात ध्वनिप्रदूषणाची महत्त्वाची समस्या वाढू लागली आहे. याकरिता जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आयडियल सांस्कृतिक मंच यांच्या विद्यमाने ध्वनिप्रदूषण नियंत्रण जनजागृतीची रॅली मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील कलावंतांना घेऊन आयोजित करण्यात येत असते. ही रॅली बेस्ट परिवहनच्या ओपन डेक बसमधून काढण्यात येते. या रॅलीत पथनाट्याच्या माध्यमातून मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील गोविंदा पथकांना भेट देऊन त्या ठिकाणी १0 मिनिटे डॉलबी साऊंड सिस्टीम बंद करून, पथनाट्याचे सादरीकरण करून जनजागृतीची मोहीम राबविली जाते. याचबरोबर एक नॉइजलेस दहीहंडी दादर येथे बांधली जाऊन ती नामवंत चित्रपट कलावंतांच्या उपस्थितीत फोडली जाते. प्रदूषणमुक्त दिवाळीची अभिनव संकल्पनादिवाळी उत्सवात फटाक्यांमुळे होणारे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण यावर व्यापक जनजागृती व्हावी याकरिता आकाशकंदीलांच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा, फटाक्याने कान फोडू नका, दिवाळी आहे शांततेची, भक्तीचे प्रतीक असा अभिनव संदेश देण्यात येतो. याचनिमित्ताने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंत्रालयातील सर्व मंत्रिगण, आमदार, सचिव यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा, असा संदेश देणारा दिवाळी संच भेट दिला जात आहे. या दिवाळी संचात पाच पणत्या, वाती, सुगंधी उटणे, रांगोळी, रांगोळीचे रंग, रांगोळी काढण्याची जाळी, सुगंधी साबण, तुळशीच्या बिया आणि शुभ दीपावलीचा संदेश देणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शुभसंदेशाचे ग्रिटिंग कार्ड असा संच विनामूल्य भेट दिला जात आहे. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा असा संदेश मुंबई सर्कलमधील एक कोटी मोबाइलधारकांना, मुंबई शहरातील लोकल ट्रेनमध्ये दूरचित्रवाणी संचावर, राज्यातील दोनशे डिजिटल सिनेमागृहांत, राज्यातील अग्रगण्य दूरचित्रवाहिन्या, एफ.एम. रेडिओ या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास मोठे सुतळी बॉम्ब, फटाके वाजविण्याचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. हे व्यापक जनजागृतीचे यश म्हणायला हवे. वसुंधरा पुरस्कारराज्यात प्रदूषण नियंत्रण व समृद्ध पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने वसुंधरा पुरस्कार ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. सन २00९ सालापासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली असून, पर्यावरण क्षेत्रात प्रदूषण नियंत्रणाकरिता विशेषत्वाने अग्रभागी असणाऱ्या संस्थाकरिता या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. अशाच पद्धतीने अभिनव स्पर्धा घेणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे भारतातील एकमेव मंडळ आहे. ही स्पर्धा औद्योगिक आस्थापना (लहान व मोठे उद्योग असे स्वतंत्र दोन गट), महानगरपालिका व नगरपालिका, या दोन विभागांसाठी घेण्यात आली आहे. या वर्षी उएळढ या नवीन विभागाचा समावेश करण्यात आला आहे. तर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, खाजगी शाळा व महाविद्यालये यांच्याकरितादेखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यावरणविषयक आंतरशालेय नाट्यस्पर्धाम. प्र. नि. मंडळ व ईको फोक्स या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर व नाशिक या पाच शहरांत शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणविषयक आंतरशालेय नाट्यस्पर्धा घेण्यात येतात. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत ५00पेक्षा जास्त शाळा सहभागी होत आहेत. ही स्पर्धा प्राथमिक फेरी व अंतिम फेरी या दोन फेऱ्यांत त्या त्या केंद्रांवर आयोजित करण्यात येत असते. या स्पर्धेत तीन हजारपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी व शिक्षक सहभागी होत असतात. स्वागत नववर्षाचे, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचे प्रत्येक नवीन वर्षाचे स्वागत आपण नवीन व्यक्तिगत संकल्प करून करीत असतो. परंतु समृद्ध पर्यावरणाच्या निर्मितीकरिता आपण संकल्प करावा अशी ही स्पर्धा मप्रनि मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असते. मागील वर्षी दिवसभरात आपण किमान १ लीटर पाण्याची बचत करू, घरगुती पाण्याचे व्यवस्थापन व पुन:वापर, किमान विजेचा वापर, दिवसभरात किमान पाच युनिटची वीज बचत, आठवड्यातून किमान दोन दिवस सार्वजनिक वाहनाचा वापर, प्लास्टीक पिशव्या वापरणे बंद करणे, ओला कचरा, सुका कचरा वेगळा करणे अशा वेगवेगळ्या निश्चय व संकल्पनेतून पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी समृद्ध पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी होण्याचा निश्चय केला होता. यातील उत्कृष्ट निश्चय व संकल्प करणाऱ्या नागरिकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत असते. पर्यावरणविषयक राज्यस्तरीय वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा राज्यातील शहरी व ग्रामीण विभागात पर्यावरणविषयक व प्रदूषण नियंत्रण विषयक कामकाज अनेक संस्था अथवा व्यक्ती सेवावृत्तीनं करीत असतात. वर्तमानातील समाजजीवनात दृकश्राव्य माध्यमाचा खूप पगडा आहे. म्हणूनच याच माध्यमाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन गेल्या चार वर्षांपासून करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या पर्यावरणाच्या समस्येशी सांगड घालत व्यक्तिगत पातळीवर किंवा संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनेक जण स्थानिक पातळीवर लघुचित्रपटाची निर्मिती करीत असतात. परंतु अशा लघुचित्रपटांना स्पर्धात्मक वाव अथवा त्यांचे मूल्यमापन मात्र होत नसल्याने अशा होतकरू, हौशी व व्यावसायिक लघुचित्रपट निर्मितीत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना पर्यावरण क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासाठी पर्यावरणविषयक राज्यस्तरीय लघुचित्रपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती. दरवर्षी या स्पर्धेत ८0पेक्षा जास्त स्पर्धक भाग घेत असतात. वसुंधरा फोटोथॉन स्पर्धामुंबई शहरातील पर्यावरणविषयक समस्यांशी निगडित फोटोथॉन या अभिनव स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र निसर्ग उद्यान व ईको फोक्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेला दुपारी १२ वाजता सुरुवात होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई शहरातील पर्यावरणविषयक व प्रदूषणविषयक प्रश्नांबाबत केवळ २४ तासांच्या कालावधीत केवळ पाच छायाचित्रांच्या (फोटोग्राफ्स) माध्यमातून स्पर्धकांनी छायाचित्र स्पर्धेत दाखल करावयाची होती. यातून मुंबई शहरातील पर्यावरणविषयक समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर केवळ १२ तासांच्या कालावधीत ३५0 छायाचित्रकारांनी आॅनलाइन प्रवेशिका दाखल करून सहभाग घेतला होता. यामधील विजयी स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अशी अभिनव स्पर्धा घेणारे मप्रनि मंडळ हे एकमेव मंडळ आहे.पर्यावरणाचे व प्रदूषणाचे प्रश्न हे शहरी व ग्रामीण जीवनाशी समानधर्मी असल्याने पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्र मातून प्लास्टीक हटाव देश बचाव, झाडे लावा पाणी वाचवा, घरातील प्रत्येक व्यक्तीने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा, सेंद्रिय शेती करा, कचऱ्यातून खताची निर्मिती, शेतीपंप मर्यादित कालावधीत चालवा, वीज-पाण्याची बचत करा असे विविध संदेश या वारीत दिले जातात. एकूण १६ दिवसांच्या या वारीत कीर्तन, भारूड, पोवाडा, गणगवळण-बतावणी अशा लोककलांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येते. ही वारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्र मांक ८६यामधून आळंदी ते पंढरपूर अशी मार्गक्र मण करीत असते. या वारीत हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे पर्यावरणाचे कीर्तन, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारूडकार श्रीमती चंदाबाई तिवाडी व राष्ट्रीय पोवाडा कलावंत श्री शाहीर देवानंद माळी यांच्यासह दोनशे वारकरी, लोककलांचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ते पंढरपूर या पायी वारीत मार्गक्र मण करीत असतात. या वारीचा समारोप पंढरपूर येथे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री व अन्य मंत्रिगणांच्या उपस्थितीत संपन्न होत असतो. या वारीच्या माध्यमातून समृद्ध पर्यावरणाचा संदेश पाच लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचविला जातो. अशा पद्धतीने पर्यावरणाची वारी आयोजित करणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे संपूर्ण भारतातील एकमेव मंडळ आहे. वर्तमानातील प्रगतीशील वाटचालीत शहरांचे बदलते रूप, विकासाबरोबर निसर्गाची होत असलेली हेळसांड यामुळे विकासाबरोबर पर्यावरणाचे अनेक प्रश्न सामोरे येऊ लागले आहेत. प्रदूषण नियंत्रणाकरिता अनेक कायदे अस्तित्वात असताना कायद्याच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणे केवळ अशक्यप्राय असून, त्याकरिता प्रत्येक व्यक्तीत मानसिक बदल घडविणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन ही केवळ शासनाचीच जबाबदारी नसून त्याकरिता समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीचा व्यापक सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. याकरिता पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून थेट सर्वसामान्य माणसापर्यंत संवाद साधण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून नावीन्यपूर्ण उपक्र म आयोजित करण्यात आले आहेत. विविध नावीन्यपूर्ण उपक्र म प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आयोजित केले जातात. असे नावीन्यपूर्ण उपक्र म आयोजित करणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ संपूर्ण भारतातील एकमेव मंडळ आहे. केवळ कायद्याच्या माध्यमातून प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे वर्तमानातील प्रगतिपथावरील जीवनशैलीला काहीसे अशक्यप्राय, त्याकरिता शासनाने लालफितीच्या कारभारापलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाच्या लोकसहभागातून मानसिक परिवर्तन घडवून आणणे, तशी सकारात्मक सामाजिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ सातत्याने चळवळीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणविषयक जनजागृतीकरिता सर्वसामान्य माणूस हाच प्रमुख कार्यकर्ता अर्थातच समृद्ध पर्यावरणाचा राजदूत असल्याचे मानले व त्या अनुषंगाने विविध नावीन्यपूर्ण उपक्र म आयोजित केले. अशाच काही जनजागृती उपक्र मांचा हा धावता आढावा. प्रगतीशील वाटचालीत पर्यावरण व प्रदूषणाचे प्रश्न भेडसावत आहेत. पण यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे आपण स्वत: सहजपणे सोडवू शकतो. उदाहरणार्थ प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर जरी आपण टाळला तरी त्यातून निर्माण होणारे अनेक गंभीर प्रश्न रोखले जातील. याकरिता मानसिक निश्चयाची नितांत गरज आहे.- रामदास कदम, पर्यावरणमंत्री, महाराष्ट्र राज्यपर्यावरण आणि प्रदूषणाच्या प्रश्नावर एकीकडे व्यापक चर्चा होत आहे. त्याकरिता सामाजिक पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था किंवा शासनाच्या स्तरावरून अंमलात आणले जाणारे कायदे, जनजागृतीपर उपक्रम यामध्ये सर्वसामान्य माणसाचा सहभाग महत्त्वाचा आहे. याकरिता आपण प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.- प्रवीण पोटे पाटील, पर्यावरण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्यपर्यावरण संरक्षण, संवर्धन व लोकजागृती याकरिता शालेय विद्यार्थ्यांच्यात निसर्गाची अभिरुची निर्माण होण्याची गरज आहे. आपले सण आणि उत्सव निसर्गाशी नातं सांगत पर्यावरणपूरक कसे साजरे करावेत असा संस्कार वर्तमानातील विद्यार्थ्यांवर केल्यास त्यातून भविष्यातील तरुण समृद्ध पर्यावरणाचे राजदूत म्हणून कार्यरत राहतील.- मालिनी शंकर, प्रधान सचिव, पर्यावरण विभागपर्यावरणविषयक प्रश्नांची उकल करीत असताना केवळ कायद्याच्या माध्यमातून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्याकरिता व्यापक जनजागृतीची नितांत आवश्यकता आहे. या चळवळीतून केलं जाणारं मानसिक परिवर्तन ही समृद्ध पर्यावरणाची नांदी ठरू शकते. - डॉ. पी. अन्बलगन, (भाप्रसे) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळसंकल्पना आणि संयोजन : संजय भुस्कुटे