शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या वेळापत्रकात बदल

By admin | Updated: January 9, 2017 03:30 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक आणि वन सेवा या पदांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक आणि वन सेवा या पदांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव हा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांची त्याची नोंद घ्यावी, असे एमपीएससीतर्फे कळविण्यात आले आहे.एमपीएससीच्या वतीने २१ नोव्हेंबर २०१६ रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात विक्रीकर निरीक्षक -२०१६ या पदाची पूर्व परीक्षा २९ जानेवारी रोजी, तर मुख्य परीक्षा २८ मे रोजी घेतली जाणार असल्याचे नमूद केले होते. परंतु, विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा २८ मेऐवजी ३ जून रोजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क गट क दुय्यम निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा २ जुलै रोजी व मुख्य परीक्षा १५ आॅक्टोबर रोजी घेतली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता या पदाची पूर्व परीक्षा २८ मे रोजी तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाईल.महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७ या पदाची पूर्व परीक्षा ४ जून रोजी, तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. परंतु, बदललेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा १५ आॅक्टोबर रोजी होईल. विक्रीकर निरीक्षक व वन सेवा पदाच्या पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, शासनाकडून निश्चित कालावधीत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच वेळापत्रकानुसार पदे जाहीर करून परीक्षा घेतली जाईल, असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.