शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नैदानिक चाचणी वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:27 IST

राज्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या, शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची होणारी पायाभूत चाचणी आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणीच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : राज्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या, शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची होणारी पायाभूत चाचणी आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. या आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये सर्व शाळांना परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र विद्या प्राधिकरणातर्फे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.इयत्ता दुसरी ते नववीच्या प्रथम भाषेची परीक्षा १६ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, तर गणित विषयाची परीक्षा १८ आॅगस्ट, इंग्रजी (तृतीय भाषा) विषयाची परीक्षा २२ आॅगस्ट आणि २३ आॅगस्ट रोजी विज्ञान विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या सर्व परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येणार आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये, तीन शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या नैदानिक चाचण्यांचे पेपर व्हायरल झाले होते. त्यामुळे यंदा गोपनीयता पाळण्याचे निर्देश आहेत. २४ आॅगस्टपर्यंत प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.