मुंबई : बालकामगार सुधारणा विधेयक २००२ मधील दुरुस्तीला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे बालमजुरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शिवाय या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त करीत यापेक्षा गरीब कुटुंबाच्या आर्थिक सक्षमेतवर भर देण्याची गरज असल्याचे मत विविध स्तरांतून मांडण्यात आले आहे. बालकामगार विधेयकात नव्याने करण्यात आलेल्या तरतुदीनुसार सर्व प्रकारच्या श्रमांमध्ये १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मूल कुटुंबात किंवा कौटुंबिक व्यवसायात काम करीत असेल तर त्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. शिवाय धोकायदायक कामांमधील मुलांचा सहभाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
बदलामुळे बालमजुरी वाढेल
By admin | Updated: May 14, 2015 02:24 IST