शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

‘भूदान’च्या कायद्यात व्हायला हवेत काळानुरूप बदल !

By admin | Updated: May 19, 2015 01:19 IST

सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांचे मत

अकोला : भूदानचा कायदा बर्‍याच वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. या कायद्याच्या मुळ गाभ्याला हात न लावता त्यामध्ये काळानुरूप थोडेफार बदल करण्याची गरज आहे. त्याकरिता आम्ही राष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे मत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांनी व्यक्त केले.स्व. रामकृष्ण आढे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ महाराष्ट्र सवरेदय मंडळाचे राज्य अधिवेशन केळीवेळी येथे पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आलेले महादेवभाई विद्रोही यांनी सवरेदय चळवळीचा 'भूतकाळ आणि भविष्यकाळ' यासंदर्भात 'लोकमत'शी संवाद साधला. प्रश्न : भूदानची चळवळ का मंदावली? महादेवभाई : आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण आणि दादा धर्माधिकारी यांच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर काम करणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व राहिले नाही. जे ग्रामदान मिळाले त्याचे काम पूर्ण झाले नाही. पूर्वी कायदा नव्हता, त्यामुळे कायदा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र कायदा झाल्यानंतर आता सर्व काम कायदाच करेल, असे ग्रामदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी गृहीत धरले. त्यासोबतच लोक भौतिक सुखाकडे वळत आहेत. त्यामुळे त्यांनी चळवळीकडे पाठ फिरविली.

प्रश्न : चळवळ वाढविण्यासाठी काय करायला हवे?महादेवभाई : भूदान चळवळीला गावागावापर्यंत घेऊन जावे लागेल. कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी लागेल. भूदानचे महत्त्व, त्याचे फायदे गावकर्‍यांना समजावून सांगावे लागतील. भूदान चळवळीचे महत्त्व नव्या पिढीला आधुनिक युगात कसे महत्त्वाचे आहे, हे सांगावे लागेल. प्रश्न : सवरेदयची विचारधारा आधुनिक युगात कितपत लागू पडते? महादेवभाई : जग विनाशाकडे वळते आहे आणि यातून केवळ महात्मा गांधी यांची विचारधाराच जगाला वाचवू शकते. पदोपदी हिंसा घडत असलेल्या या जगात परिस्थिती आणखी भीषण होणार आहे. गांधीजींनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखविला. या मार्गावर चालले तरच देशात शांतता नांदू शकेल.

प्रश्न : जलसंधारणावर व जलसंवर्धनावर आपण नेहमीच भर देता, यामागील कारण काय? महादेवभाई : आगामी काळात पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवणार आहे. सध्या पृथ्वीचे शोषण सुरू आहे. पाण्याचा अर्मयाद उपसा सुरू आहे. यावर निर्बंध घालायला हवे. गांधीजींनीही जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे. सध्या जगात असलेल्या लोकसंख्येचे पोषण करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये आहे. तिच्यामध्ये तेवढी उपलब्धता आहे; मात्र लोभापायी लोक पृथ्वीचे शोषण करीत आहे. हे असेच सुरू राहिले तर भविष्यात मानवाला अनेक भीषण संकटांचा सामना करावा लागेल.

प्रश्न : सवरेदय संघटनेची देशभरात काय स्थिती आहे?महादेवभाई : सवरेदय संघटना देशातील २८ राज्यांपैकी २३ राज्यांमध्ये आहे. या राज्यांमध्ये नियमित बैठका व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रामुख्याने ज्या गावांमध्ये ग्रामदान झाले आहे, त्या गावांमध्ये अनेक कार्यक्रम पार पडतात.

प्रश्न : भूदानमध्ये दिलेल्या जमिनीचे काय झाले? महादेवभाई : भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांच्या आवाहनाला मान देत ४७ लाख एकर जमीन दान देण्यात आली. यापैकी ५0 टक्के जमीन वाटण्यात आली आहे तर ५0 टक्के जमिनीची वाटणी अजूनही बाकी आहे. या जमिनीची वाटणी शेती नसलेल्यांमध्ये करायची आहे. काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्याची वाटणी केल्या जाईल.