शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षेचे स्वरूप बदलले

By admin | Updated: November 18, 2016 06:25 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आता सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आता सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत केले जात असले तरी सर्वप्रथम रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.एमपीएससीतर्फे सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या भरतीकरिता स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्वपरीक्षा घेतल्या जातात. या तीनही परीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत. स्वतंत्र पूर्वपरीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्वतयारी अभ्यास, प्रवास, निवासव्यवस्था, रजा घेणे अशा बाबींवर उमेदवारांना पुन्हा पुन्हा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी एमपीएससीने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.या पदांच्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार यापैकी एका, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छिता काय? असा विकल्प अर्ज भरून घेतला जाणार आहे. तसेच संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामाईक पूर्वपरीक्षेच्या आधारे तीनही पदांकरिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील. त्यानंतर त्या त्या पदाच्या मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची विद्यमान मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रमांच्या आधारे, स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नसंख्या, गुण, वेळ आदी बाबींत कोणताही बदल असणार नाही. हा बदल २0१७ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या विविध पदांच्या जाहिरातींना लागू असणार आहे. दरम्यान, लिपिक -टंकलेखक, कर सहायक, विक्रीकर विभाग तसेच पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या सध्या एकाच टप्प्यात, लेखी परीक्षाद्वारे घेण्यात येतात. या परीक्षेकरिता प्राप्त होणाऱ्या अर्जांची मोठी संख्या लक्षात घेऊन या तीनही पदांकरिता यापुढे पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पदांच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त परीक्षा घेण्यात येईल, असेही परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.