यदु जोशी - मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद रद्द करून प्रत्येक महसूल विभागासाठी एक याप्रमाणो प्रभारी नेमण्यात येणार आहेत. पक्षाच्या प्रत्येक आघाडीला (सेल) अध्यक्ष असेल पण सेल आणि पक्ष यांच्यात समन्वयाची जबाबदारी एका पदाधिका:यांकडे दिली जाईल.
पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार आहे. कार्यकारिणीच्या स्वरुपाबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी लोकमतला माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागू नये म्हणून ठिकठिकाणची नाराजी दूर करण्याची जबाबदारी प्रमुख सहा नेत्यांना देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
केसरकर संपर्कात
उद्योग मंत्री नारायण राणो यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकविल्याने राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. आता केसरकर यांच्याशी असलेला दुरावा कमी होण्याचे संकेत तटकरे यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मला ते भेटून गेले. लवकरच त्यांच्या विषयी निर्णय घेऊ, असे तटकरे म्हणाले.
काँग्रेसने कारवाई केली का?
काँग्रेसच्या विरोधात बंड केलेल्यांना पुन्हा जवळ करण्याचा अर्थ त्यांच्या बंडखोरीला राष्ट्रवादीचे अप्रत्यक्ष समर्थन होते, असा होत नाही का, या प्रश्नात तटकरे म्हणाले की काँग्रेसने आमच्या उमेदवारांविरुद्ध बंड केलेल्यांवर कारवाईदेखील केली नाही. त्यांच्या उमेदवारांविरुद्ध त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी कारवाया केल्या पण त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. त्यांचे विजय सावंत, रामप्रसाद बोर्डीकर यांना त्यांनी धक्काही लावला नाही. आम्ही विजयकुमार गावितांना मंत्रीपदावरून हटविले. केसरकरांना कारणो दाखवा नोटीस बजावली. काँग्रेसने काहीच केले नाही. विदर्भात पाच जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीची भाजपासोबत असलेली अभद्र युती तोडण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत अनेकदा होवूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, याकडे लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक तातडीने घेण्याविषयीचे पत्र मी उद्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. या बैठकीत सदर मुद्यावर चर्चा करू.
सिटिंग-गेटिंग नाही?
च्राष्ट्रवादीच्या सर्व 62 आमदारांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देणार का, या प्रश्नात तटकरे म्हणाले की ‘सिटिंग-गेटिंग’ फॉम्यरुला राहील, असे ठरलेले नाही. त्यातील काही जागांवर नवे चेहरे दिले जातील.
च्पक्षाचे काही नेते पक्षाबाहेर आपापल्या संघटना चालवितात. त्याचा पक्षाला फायदा होतो आणि तोटाही. या संघटनांबाबत पक्षाचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा-सेनेवाले संपर्कात
च्राष्ट्रवादीतून मोठय़ा प्रमाणात नेते, कार्यकर्ते भाजपा-शिवसेनेत जात असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी ते खरे नाही. काही लोक जात आहेत पण त्यांचा लवकरच भ्रमनिरास होईल. येत्या काही दिवसांत चक्र उलटे फिरेल आणि भाजपा, शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीत येत असल्याचे पहायला मिळेल, असा दावा तटकरे यांनी केला.